शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विविध कामांची केली प्रत्यक्ष पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:51 IST

तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, भातखाचर व सेंद्रीय शेती व वृक्षारोपण अशा विविध कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) प्रत्यक्ष पाहणी केली. तर सोबतच निवडणूक कार्यक्रमाला घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : निवडणूक कामांवर केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार, भातखाचर व सेंद्रीय शेती व वृक्षारोपण अशा विविध कामांचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.४) प्रत्यक्ष पाहणी केली. तर सोबतच निवडणूक कार्यक्रमाला घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी तिरोडा येथे शनिवारी (दि.४) भेट दिली. या भेटीत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ग्राम पालडोंगरी येथे तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच ग्राम करटी येथील भातखाचरांची प्रत्यक्ष पाहणी केली. एवढेच नव्हे तर ग्राम बिहीरीया येथील कॅटल शेड, सेंद्रीय शेती व वृक्षारोपणाची माहिती जाणून घेत पाहणी केली.तालुक्यात विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी निवडणूक कामांबाबत बीएलओ व त्यांच्या पर्यवेक्षकांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी बीएलओ म्हणून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगर परिषद कर्मचारी आदिंना मार्गदर्शन केले. सन २०१९ मध्ये येत असलेल्या लोकसभा निवडणुकांना घेऊन मतदार याद्या अद्ययावत करण्याचे हे काम सुरू आहे. यात स्थलांतरीत झालेले, मरण पावलेले, दोनदा नाव असलेले मतदार अशांची यादी अद्ययावर करून नवीन मतदारांची यादी तयार करून १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तसेच सध्या मतदार यादीत असलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो बदलून कलर फोटोंचा त्यात वापर केला जाणार असल्याचेही सांगीतले.आढावा बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभांगी आंधळे, उप विभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे, तहसीलदार संजय रामटेके, खंड विकास अधिकारी देवेंद्र हरिणखेडे, तालुका कृषी अधिकारी एम.ए.वावधने, उप अभियंता अनंत जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीसाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस पाटील, नगर परिषद कर्मचारी, कृषी कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी