शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृत धान्य वाटपात सालेकसा जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:41 IST

२५ टक्के नागरिक निरक्षर त्यातच गरीब आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्याची गणना नेहमी मागास तालुक्यात होत होती. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना हक्काचे गहू, तांदूळ दर महिन्याला बरोबर मिळत नव्हते.

ठळक मुद्देपुरवठा विभाग : ९८.८ टक्के शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : २५ टक्के नागरिक निरक्षर त्यातच गरीब आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्याची गणना नेहमी मागास तालुक्यात होत होती. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना हक्काचे गहू, तांदूळ दर महिन्याला बरोबर मिळत नव्हते. मात्र स्वस्त धान्य दुकानात पार्इंट आॅफ सेल (पीओएस) संगणीकृत प्रणालीव्दारे शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप सुरू झाल्याने आदिवासीबांधवाना सुध्दा नियमित धान्य मिळत आहे. संगणीकृत पध्दतीने धान्य वाटप करण्यात हा तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे.सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली आता संगणीकृत झाल्याने स्वस्त धान्य दुकानात सार्वजनिक वितरण प्रणालीत होणाऱ्या भ्रष्टाचार सुध्दा काही प्रमाणात कमी झाला आहे. संगणीकृत पीओएस प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब आदिवासी कुटूंबाला हक्काचे पोटभर जेवण उपलब्ध होत आहे. पीओएसच्या माध्यमाने धान्य वाटप करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे.आदिवासी, डोंगराळ भागात असलेल्या सालेकसा तालुक्यात वेळोवेळी इंटरनेटची समस्या निर्माण होत होती. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने यावर सुध्दा मात करुन पीओएस प्रणालीची ९८.९ टक्के अंमलबजावणी केली.ही धान्य वाटप प्रणाली २०१७ पासून सुरु करण्यात आली. या अंतर्गत सालेकसा तालुक्यातील शंभर रेशन दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील ९८.९ टक्के शिधापत्रिकाधारकांना नियमित व पुरेपूर धान्य वाटप होत आहे.१६ हजार शिधापत्रिकाधारकतालुक्यातील एकूण शिधापत्रिकांधारकांची संख्या १६ हजार २६४ असून त्यांना एकूण ८७ स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांसह एकूण १०३ ठिकाणी केरोसीन विक्री करणारे आहेत.शासनामार्फत मिळणाºया अनुदान सोयी सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे या हेतुने संगणीकृत धान्य वाटप प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यामुळे गरीब, आदिवासी व गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे अन्न धान्य मिळण्यास मदत होत आहे.- सी.आर.भंडारी, तहसीलदार, सालेकसास्वस्त दुकानातून मिळणारे धान्य दर महिन्याला नियमित मिळत असून माझ्या कार्डावरील धान्य मलाच मिळते. त्यामुळे शासनाने सुरु केलेली संगणीकृत धान्य वाटप पध्दती सर्व सामान्य गरीब लोकांसाठी हिताची ठरत आहे.- आनंदराव पंधरे, शिधापत्रिकाधारक, पोवारीटोला.