शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित पूर्ण करा

By admin | Updated: March 10, 2017 00:40 IST

प्रकल्पबाधित झालेले व प्रकल्पबाधीत गावाच्या मागण्यांबाबत संबंधित यंत्रणा व प्रशासनाकडे काही वर्षापासून विनंती केली जात आहे.

उपोषणाचा इशारा : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनकाचेवानी : प्रकल्पबाधित झालेले व प्रकल्पबाधीत गावाच्या मागण्यांबाबत संबंधित यंत्रणा व प्रशासनाकडे काही वर्षापासून विनंती केली जात आहे. अदानी प्रकल्प या गावाला न्याय लवकर देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र काही अडचणींमुळे प्रकरण लांबत असल्याने त्वरित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.अदानी व्यवस्थापन व प्रशासन यांनी नागरिकांची गंभीर समस्या लक्षात घेता तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मेंदीपूर येथे मंगळवार (दि.७) संपूर्ण गावाची सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्ञानिराम ठोंबरे होते. या वेळी प्रामुख्याने सरपंच मुक्ता रहांगडाले, उपसरपंच भोजेश्वर बारसागडे, इंदिरा चौधरी, शिवदास पारधी, अलका सूर्यवंशी, बेनू मारबदे, भाऊलाल चौधरी यांच्यासह ४०० नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविकातून उमेश पारधी यांनी मेंदिपूर, भिवापूरटोला, उदईटोला (गुमाधावडा) येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती सांगितली. यावर सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेवून मागण्यांचे निवेदन तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना दिले. निवेदनामध्ये प्रदुषण कायमस्वरुपी बंद करणे, गावाचे त्वरित स्थानांतर करावे, शासनाच्या नियमानुसार निधी किंवा भुखंड द्यावे, शेतकऱ्यांची जमीन विक्री करण्यात आली त्यांना पॅकेज द्यावे, नागरी सुविधांची पूर्ती करावी, १९८९ ते ९१ मध्ये शेतकऱ्यांची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने अल्प दरात संपादित केली त्यांना वाढीव मोबदला द्यावा, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेप्रमाणे बाधीत गावातील लोकांना व प्रकल्पग्रस्तांना ६०० रुपये मासिक मानधन देण्यात यावे, बाधीत गावांच्या बेरोजगारांना रोजगार द्यावे, कृषी मजुरीच्या फरकाची रक्कम त्वरित द्यावी, १९८९ ते २०१० मध्ये औद्योगिक महामंडळात संपादित जमीन धारकांना प्रकल्पग्रस्तांना ६०० रुपये मासिक मानधन द्यावे, कृषी मजुरीच्या फरकाची रकम त्वरित द्यावी, १९८९ ते २०१० मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात संपादित जमीनधारकांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देण्यात यावा व प्रकल्पबाधीत गावांना दोन कोटी अर्थ सहाय्य देण्यात यावे, अशा मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)