शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

६० दिवसांत ६.१६ कोटींचे काम पूर्ण

By admin | Updated: June 24, 2017 01:46 IST

सन २०१७-१८ मध्ये तिरोडा मग्रारोहयो अंतर्गत दररोज ११ हजार ५०० मजुरांना दोनशेच्या वर कामांमध्ये सामावून घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क काचेवानी : सन २०१७-१८ मध्ये तिरोडा मग्रारोहयो अंतर्गत दररोज ११ हजार ५०० मजुरांना दोनशेच्या वर कामांमध्ये सामावून घेण्यात आले. ६० दिवसांत म्हणजे १५ जूनपर्यंत सहा कोटी १६ लाख रूपये खर्च करण्यात आले. संपूर्ण कामे सुरळीत पार पडली तरी कामावर तीन वर्षांत तीन मजुरांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांना लाभ देण्यात आला तर एका कुटुंबाने मृत्यू दावा घेण्यास नकार दिला. तिरोडा तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत कालवा दुरूस्ती, नाला सरळीकरण, पांदण रस्ता, तलाव खोलीकरण, शौचालय, घरकूल, गुरांचे गोठे बांधकाम व विहीर बांधकाम अशी अनेक कामे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१७ ते १५ जून २०१७ पर्यंत करण्यात आले. यात प्रत्येक दिवसाला सरासरी ११ हजार ५०० मजुरांना कामाचा लाभ घेता आला. आठवडी बाजाराकरिता एक दिवसाची सुट्टी वगळता महिन्यात २४ दिवस मजुरांना काम देण्यात आले. एप्रिल महिन्यात एकूण २१४ काम सुरू होते. या कामावर दरदिवसी नऊ हजार ७९५ मजुरांनी काम केलेले आहे. मे २०१७ मध्ये १६९ कामे सुरू होते. यावर दर दिवसाला ११ हजार ९७७ मजुरांना काम देण्यात आले. तर जून २०१७ मध्ये १५७ कामे सुरू होते. यात दरदिवसी १० हजार ते सर्वाधिक १३ हजार ५७७ मजुरांनी काम केले आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तिरोडा तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत जिल्ह्यातून सर्वाधिक कामे झाल्याची माहिती आहे. आजपर्यंत खर्च करण्यात आलेल्या कामाच्या निधीनुसार सर्वच कामे पूर्ण झाले का, याबाबत चौकशी केली असता काही कामे अपूर्ण असल्याची माहिती पंचायत समितीच्या सूत्रांनी दिली. तसेच मजुरांना वेतन देण्यास निधी कमी पडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु कुशल साहित्याचा निधी डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत उपलब्ध झाला नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र आता सर्व सुरळीत झाल्याचे सहायक कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. किती मजुरांना ९० दिवस काम मिळाले, या प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण यांनी सांगितले की, दिवसांची परिगणना १ एप्रिल ते ३१ मार्च या दरम्यान केली जाते. सन २०१६-१७ मध्ये तीन हजार ५०० मजुरांना ९० दिवस काम मिळाले होते. रोजगार सेवकांनी ९० दिवसांचे काम पूर्ण करणाऱ्यांची यादी तयार करून कामगार कल्याण आयुक्तालयात नोंदणी केली जाते. ज्यांनी नोंदणी केली त्यांना शासनाकडून घोषित योजनांचा लाभ दिला जातो, असेही कार्यक्रम अधिकारी एल.डी. चव्हाण यांनी सांगितले. मृत महिलेच्या कुटुंबाने लाभ नाकारला तिरोडा तालुक्यात मग्रारोहयोंतर्गत सुरू असलेल्या कामावर तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात बिहिरीया येथील लखन भदू शहारे यांचा मृत्यू झाला होता. त्यांना शासनातर्फे ५० हजार रूपयांची मदत देण्यात आली होती. २०१६-१७ या आर्थिक वर्षात सीतेपार येथील बलीराम नागो रोकडे यांचा मृत्यू १९ मे २०१६ रोजी कामावर असताना झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा मृत्यू लाभाची रक्कम देण्यात आली होती. तर यावर्षी २०१७-१८ मध्ये करटी येथील तरासन विठोबा पटले (५५) या महिलेचा ३० मे २०१७ रोजी दुपारी ३.३० वाजता कामावर असताना प्रकृती बिघडली. तिला उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी नकार दिल्याने त्या कुटुंबाला आर्थिक दावा देण्यात आला नाही. सदर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तसे लेखी लिहून दिले आहे.