शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धविहाराचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST

गोंदिया : गावात नवीन बुद्ध विहार मंजूर झालेले आहे आणि आम्ही ते बनवून देतो म्हणून गावातील काही कंत्राटदारांनी अस्तित्वात ...

गोंदिया : गावात नवीन बुद्ध विहार मंजूर झालेले आहे आणि आम्ही ते बनवून देतो म्हणून गावातील काही कंत्राटदारांनी अस्तित्वात असलेले जुने बुद्ध विहार पाडले. परंतु २ वर्षे उलटूनही नवीन बुद्ध विहाराचे बांधकाम अर्धवटच पडून आहे. त्यामुळे बुद्ध विहाराचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करून देण्याची मागणी तालुक्यातील मोरवाही येथील समता बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभा शाखा मोरवाही यांच्या संयुक्तवतीने स्थानिक विश्रामगृहात बुधवारी (दि.११) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सन २०१८ मध्ये तत्कालीन समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या विकासनिधीतून बुद्ध विहारासाठी जवळपास ६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यासाठी नवीन बुद्ध विहार बांधावयाचे आहे अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते राजू ब्राम्हणकर यांनी दिली. त्यानंतर नवीन बुद्धविहाराच्या बांधकामासाठी जुने बुद्ध विहार तोडण्यात आले. यासाठी प्रशासनाकडून परवानगी घेतली नाही. तर दोन वर्षांचा कालावधी लोटूनही बुद्धविहाराच्या बांधकामाला सुरुवात केली नाही. येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी इतरत्र दुसरी कुठेही जागा उपलब्ध नसल्यामुळे व या रखडलेल्या बुद्ध विहारात धार्मिक विधी होत नसल्याने त्यांना आपले धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी मोठी अडचण होत असल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. याची कुठलीच चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. बांधकामास विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी विजय मेश्राम, अजय भालाधरे, रजनीकांत वैद्य, आशिष मेश्राम, अनिल रामटेके, कीर्तीकुमार मेश्राम, साहिल मेश्राम, शुभम नागरीकर, किरण मेश्राम, अर्चना मेश्राम, प्रमिला मेश्राम, वसुंधरा वैद्य, संगीता रामटेके यांनी केली आहे.