शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६३ गावांत ३७८ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:21 IST

शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत सन २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण ६३ गावे निवडण्यात आली.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : सन २०१७-१८ मध्ये १.९३ कोटींचा खर्च

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत सन २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण ६३ गावे निवडण्यात आली. या ६३ गावांमध्ये आतापर्यंत एकूण ३७८ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर एक कोटी ९३ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला.यावर्षी आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांमध्ये कृषी विभागाने २९९ व पंचायत समित्यांनी ७९ अशी एकूण ३७८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात माती नालाबांध दुरूस्ती व गाळ काढणे यासारखी ६३ कामे करण्यात आली. सिमेंट बंधारा, दुरूस्ती व गाळ काढणे अशी ३ कामे पूर्ण झालेली आहेत. नाला खोलीकरण व सरळीकरणाची ७१ कामे पूर्ण झाली असून त्यावर ०.५९ कोटी रूपये खर्च करण्यात आला. तर कालवा दुरूस्तीचे केवळ एक काम करण्यात आले असून त्यावर ०.०५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. भातखाचरे दुरूस्तीची ९५ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर ०.७१३ रूपये खर्च करण्यात आले आहेत. तर बोडी खोलीकरण व जुनी बोडी दुरूस्तीचे ९८ कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय तलाव खोलीकरण व तलाव दुरूस्तीची ११ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर ०.५७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात अशी एकूण ३७८ कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली असून त्यावर १.९३ कोटी रूपये खर्च झाले आहेत.जलयुक्त शिवार अभियानाची प्रस्तावित कामेसन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात एकूण दोन हजार १८६ कामे प्रस्ताविक करण्यात आली असून त्यासाठी ८७४६.१९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात कृषी विभागाच्या एक हजार ३४६ कामांसाठी ३१०९.२२ लाख, लघू पाटबंधारे जि.प.च्या २०९ कामांसाठी २३०३.४० लाख, पंचायत समित्यांच्या १५४ कामांसाठी ८२४.२६ लाख, लघू पाटबंधारे जलसंधारणच्या ४७ कामांसाठी ९२३ लाख, वन विभागाच्या २७० कामांसाठी १२३४.११ लाख व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या १६० कामांसाठी ३५३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.