शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जलयुक्त शिवारची १७६४ कामे पूर्ण

By admin | Updated: October 7, 2016 01:53 IST

सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात अनेक कामे करण्यात आली.

सिंचन क्षेत्र वाढले : विहिरींच्या पाणीपातळीत एक फुटापर्यंत वाढगोंदिया : सिंचनाचे संरक्षित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी जिल्ह्यात अनेक कामे करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात १९६४२.३० हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे. शिवाय विहिरीतील पाण्याच्या पातळीतही सरासरी अर्धा ते एक फुटापर्यंत वाढ झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्याची क्षमता १९४५४.१९ टीसीएम आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १४४२ मिमी असून यावर्षी आतापर्यंत सरासरी झालेला पाऊस १०२९ मिमी एवढा आहे. पाणीसाठ्याची क्षमता वाढल्याने रबी व उन्हाळी पिकांना याचा लाभ मिळू शकेल. जलयुक्त शिवाय अभियानांतर्गत गाळ काढणे, खोलीकरण, रूंदीकरण करणे आदी कामांसाठी एकूण ९४ गावांची निवड करण्यात आली होती. यापैकी ५२ गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू करण्यात आली. शासनाच्या माध्यमातून २२७ व लोकसहभागातून ९९ अशी एकूण ३२६ कामे करण्यात आली. यात ५०३९२१.८१ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. तर गाळ काढलेल्या खोलीकरण/रूंदीकरण केलेल्या कामांची लांबी ७५.८१ किमी आहे. सन २०१५-१६ मध्ये पूर्ण झालेली कामे सलग समतल चर (हेक्टर) ४, माती नालाबांध २४, मजगी (हेक्टर) २९, गॅबियन स्ट्रक्चर ६४, खोल सलग समतल चर (हेक्टर) ९, शेततळे १३१, साखळी सिमेंट बंधारा १३०, सिमेंट बंधारा दुरूस्ती २२, नाला खोलीकरण-नाला सरळीकरण १२४, केटी वेअर १४ , गाळ काढणे शासकीय ११३, गाळ काढणे सीएसआर ९९, ठिंबक सिंचन (हेक्टर) २३९, तुषार सिंचन (हेक्टर) ८, वन तलाव ४४, भार खाचर दुरूस्ती (हेक्टर) ४२०, साठवण बंधारा २९, बोडी खोलीकरण-जुनी बोडी दुरूस्ती १५८, तलाव खोलीकरण-तलाव दुरूस्ती ६८, मामा तलाव दुरूस्ती २१, लघू पाटबंधारे तलाव दुरूस्ती ८, कालवे दुरूस्ती ३, इतर ३ अशी एकूण एक हजार ७६४ कामे पूर्ण झालेली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे.