शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विम्यास नकार देणाऱ्या कंपनीला हिसका

By admin | Updated: January 14, 2016 02:20 IST

शेतकऱ्यांचा अपघात विमा नाकारणाऱ्या दि न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीला जबर धक्का देत जिल्हा तक्रार तक्रार ...

ग्राहक मंच : व्याजासह रक्कम द्यागोंदिया : शेतकऱ्यांचा अपघात विमा नाकारणाऱ्या दि न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीला जबर धक्का देत जिल्हा तक्रार तक्रार निवारण न्यायमंचाने अर्जदारांना नुकसान भरपाईसह अपघाती विम्याची रक्कम देण्याचे आदेश दिले आहे.आमगाव तालुक्याच्या तिगाव येथील शेतकरी चैतराम सोमा बिसेन यांची शेत जमीन आहे. ६ जून २०१३ रोजी चैतराम बिसेन घराच्या कवेलूंची छावणी करताना शिडीवरुन पडल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात त्यांची पत्नी अनुसया बिसेन यांनी ग्राहक न्यायालयात ७ आॅक्टोबर २०१३ रोजी अर्ज केला. परंतु दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने दावा ६-क खोडून ६-ड लिहिलेला दस्तावेज असल्याचे सांगून भूमापन क्रमांक व सर्वे नंबर जळत नाही, असे कारण दाखवून त्यांचे प्रकरण फेटाळले होते. ग्राहक न्यायालयाने या शेतकरी महिलेला न्याय देत १ लाख रुपये विमा दाव्याची रक्कम व त्रासापोटी ३० हजार रुपये तक्रारीचा खर्च १० हजार रुपये ४ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंत ९ टक्के दराने देण्याचे आदेश दिले.दुसरे प्रकरण देवरी तालुक्याच्या मुरमाडी येथील आहे. नवल उदरास सोनकुकरा हे १६ जुलै २०१३ रोजी नाला पार करुन शेतात जात असताना पाय घसरल्याने पुरात वाहून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुरमाडी येथे शेत जमीन असल्याने या संदर्भात त्यांची पत्नी सुकारोबाई व मुलगा धनशू यांनी विम्यासाठी प्रकरण टाकले. त्यांनाही इंन्शुरन्स कंपनीने ६-ड हे दस्तावेज प्रस्तावासोबत जोडले नाही असे म्हणून दावा फेटाळला. यावर जिल्हा ग्राहक न्यायालयाने १ लाख रुपये विम्याची रक्कम १७ एप्रिल २०१५ पासून निकाल लागेपर्यंत दर साल दर सेकडा ९ टक्के दराने देण्याचे आदेश दिले. तसेच शारीरिक व मानसिक त्रासपोटी ५ हजार रुपये तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये महिन्या भराच्या आत देण्याचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)