शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी योजनेपासून वंचित

By admin | Updated: July 23, 2015 01:47 IST

शासनाने गोरगरिबांनाही विमाछत्र मिळावे यासाठी आम आदमी विमा नावाची कल्याणकारी योजना राबविली. मात्र येथील ...

अर्जुनी-मोरगाव : शासनाने गोरगरिबांनाही विमाछत्र मिळावे यासाठी आम आदमी विमा नावाची कल्याणकारी योजना राबविली. मात्र येथील तहसील कार्यालयाने या योजनेलाच हरताळ फासल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. मृत्यू झाल्यानंतर विमा प्रस्ताव सादर केल्यामुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित झाले आहेत. या प्रकारामुळे तालुका प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात ग्रामीण भागातील भूमिहिन कुटुंबातील लोकांसाठी शासनाने केंद्र शासनाची आम आदमी विमा योजना १६ आॅक्टोबर २००७ पासून राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत राज्यातील १८ ते ५९ वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिन कुटुंबातील रोजगार करणारा कुटूंब किंवा त्या कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती यांचा विमा उतरविण्यात आला. या योजनेत नैसर्गिक मृत्यू झाल्यास बाधित विमाधारक व्यक्तींच्या वारसानास ३० हजार रुपये हितलाभ देण्याची तरतूद आहे. वडेगाव-स्टेशन येथील संजय हनुमय्या सिल्लेवार यांनी सन २००८ मध्ये आम आदमी विमा योजनेंतर्गत पॉलिसी काढली. त्यांना १ मार्च २००८ पासून मास्टर पॉलिसी (क्रमांक ६९३४९८) अंतर्गत या योजनेतील विमा संरक्षण प्रदान करण्यात आले. त्यांचा २१ मार्च २००९ रोजी आकस्मिक मृत्यू झाला. त्यांचे वारसदार पत्नी रंजिता यांनी स्थानिक तहसील कार्यालयात दावा दाखल केला. सुमारे चार वर्षेपर्यंत त्यांनी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र त्यांना वेळोवेळी खोटारडी कारणे सांगण्यात आली. एकदा तुमचे दावा प्रकरण नागपूर येथून मंजूर होऊन आल्याचे सांगण्यात आले. दावा मंजूर होऊनही विलंब का होत आहे, याची शहानिशा करण्यासाठी त्या नागपूरला गेल्या. त्यांनी वाघमारे व हलमारे नामक अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा या प्रकरणातील बिंग फुटले. मृतकाने काढलेल्या पॉलिसीचा डाटा त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल अडीच वर्षाने १ मार्च २०११ रोजी तहसील कार्यालयामार्फत विमा कंपनीला अपलोड करण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. मृत्युनंतर अडीच वर्षाने डाटा अपलोड झाल्यामुळे या योजनेचा लाभ देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील याच पध्दतीच्या आणखी दोन प्रकरणे आढळून आल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते विजय खुणे यांनी केला आहे. त्यांची नावे नाशिक चौरे मृत्यू दिनांक १७ जानेवारी २०१० व प्रभाकर फाये मृत्यू दिनांक ७ जून २००८ अशी आहेत. गोरगरिबांच्या कल्याणाकरिता उदात्त योजना राबविण्याचे शासनाचे धोरण असले तरी लालफितशाहीच्या या अनागोंदी कारभारामुळे लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात, हेच सिध्द होते. कामचुकारपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून या तिन्ही लाभार्थ्यांची राशी वसूल करून लाभार्थ्यांच्या वारसानास लाभ देण्याची मागणी खुणे यांनी केली आहे. तालुक्यातील यासारख्या अन्यायग्रस्त लाभार्थ्यांचा तपास करण्याचे आवाहन त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे. (तालुका प्रतिनिधी)