शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

समितीने केली शहर स्वच्छतेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:08 IST

स्वच्छ भारत मिशन-२०१८ अंतर्गत राज्यस्तरीय चमूने नगर परिषदेने शहरात स्वच्छता विषयक केलेल्या कामांची पाहणी केली. बुधवार आणि गुरूवारी समितीने शहरातील विविध भागाना भेट देऊन कामांची माहिती घेतली.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन : शहरवासीयांसोबत साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्वच्छ भारत मिशन-२०१८ अंतर्गत राज्यस्तरीय चमूने नगर परिषदेने शहरात स्वच्छता विषयक केलेल्या कामांची पाहणी केली. बुधवार आणि गुरूवारी समितीने शहरातील विविध भागाना भेट देऊन कामांची माहिती घेतली. सार्वजनिक व खाजगी शौचालय आणि स्वच्छतेची पाहणी करुन शहरवासीयांसोबत संवाद साधला.हागणदारीमुक्त अभियानांतर्गत सरकारडून शौचालय बांधकामावर जोर दिला जात आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी शौचालयांच्या बांधकामासाठी सरकार पुरेपूर सहकार्य करीत आहे. शिवाय शहर स्वच्छ असावे यासाठी स्वच्छ भारत मिशन हा विशेष कार्यक्रम राबविला जात आहे. यांतर्गत शहरांना स्वच्छतेसाठी रॅकींग दिले जात आहे. स्वच्छ भारत मिशन-२०१८ सुरू झाले असून ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधतीत केंद्रीय समितीकडून स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्रीय समितीकडून होणाºया स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत नगर परिषदेने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडून ९ व १० जानेवारी स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. या राज्यस्तरीय समितीतील रूचा ठवकर व अमृता परांजपे यांनी मंगळवारी (दि.९) गोंदिया नगर परिषदेला भेट दिली. पहिल्या दिवशी त्यांनी स्वच्छता विषयक कामकाजाचा आढावा घेतला. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.१०) शहरातील छोटा गोंदिया, मरारटोली, सुर्याटोला, कुंभारेनगर परिसरातील सार्वजनिक व खाजगी शौचालयांची पाहणी केली. या पाहणी त्यांनी नागरिक उघड्यावर शौचास जातात का याची पाहणी केली. तसेच परिसरातील लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून नगर परिषदेतंर्गत राबविल्या जाणाºया कामांचा आढावा घेतला.समितीने दिल्या सूचनाया सर्वेक्षणात समितीने शौचालयांच्या मलनिसारण व्यवस्थेची पाहणी केली. सेव्हरेज ट्रिटमेंट प्लांट तयार करणे, सार्वजनिक शौचालयांभोवती सौंदर्यीकरण करणे, शौचालयासाठी वापर केल्या जात असलेल्या नगर परिषदेच्या खुल्या जागांवर वृक्षारोपण, विद्युतीकरण, खुर्च्या लावून बसण्याची व्यवस्था करून सौंदर्यीकरण करणे, शौचालयांचा वापर व स्वच्छता याबाबत शहरवासीयांत जागृती करणे याबाबत सूचना दिल्या.