शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

समितीने धरले अधिकाऱ्यांना धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:26 IST

विधानमंडळांची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी (दि.१८) जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आदिवासींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

ठळक मुद्देअनुसूचित जमाती कल्याण समिती : दोन दिवस जिल्ह्यात मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानमंडळांची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी (दि.१८) जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन आदिवासींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जवळपास चार तास समितीच्या सदस्यांनी बंदद्वार आढावा घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याची विश्वसनीय माहिती आहे.विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती गुरूवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी अर्लट झाले होते. विदर्भ एक्सप्रेसने येणारे कर्मचारी सुध्दा इंटरसिटीने सकाळीच कार्यालयात पोहचले होते. समितीने कोणत्या कार्यालयाला आकस्मिक भेट दिल्यास कारवाई होवू शकते. या भीतीने बहुतेक सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित होते. विशेष म्हणजे ही समिती देखील विदर्भ एक्सप्रेसने गुरूवारी सकाळी ११.३० वाजता गोंदिया दाखल झाली. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये एकूण १५ सदस्यांचा समावेश आहे. मात्र या समितीतील चार सदस्य गुरूवारी आले नव्हते.समिती सदस्यांमध्ये आ. संजय पुराम, प्रभुदास भिलावेकर, पास्कल धनारे, अमित घोडा, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, डॉ. संतोष टारफे, वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, आनंद ठाकुर, चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश होता.समितीच्या सदस्यांनी विश्रामगृहात विश्रांती घेतल्यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बंदव्दार आढावा बैठक घेतली.समिती अध्यक्ष व सदस्यांनी जिल्ह्यात आदिवासी बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यांची अंमलबजावणी आणि त्यांच्या विकासासाठी कुठली विशेष कामे केली याची माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळांच्या मुद्दावरुन संबंधित विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे. आदिवासी व दुर्गम भागात राबविण्यात आलेल्या काही कामांवर या समितीने आक्षेप घेतल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शुक्रवारी करणार जिल्ह्याचा दौराजिल्ह्यात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी विकासाच्या योजनांची पाहणी शुक्रवारी (दि.१९) ही समिती करणार आहे. काही आक्षेपहार्य कामांची यादी या समितीने तयार केली असून या कामांची पाहणी समिती करणार असल्याची माहिती आहे.विविध संघटनांनी दिले निवेदनयेथील विश्रामगृहात विविध आदिवासी समाज संघटनानी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांची भेट घेतली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले. शनिवारी ही समिती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार आहे.