शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून लाटतात कमिशन

By admin | Updated: September 2, 2016 01:39 IST

शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक मालामाल : एजन्सीसह कर्मचाऱ्यांचाही सहभागआमगाव : शासनाने जेव्हापासून शालेय पोषण आहार शाळेमध्ये सुरु केला तेव्हापासून अनेक जण मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत तेथे महिन्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात तांदूळ व डाळ शिल्लक राहतो. तिच्यावर संबंधित कर्मचारी व एजंसी डल्ला मारताना दिसत आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रकार सुरू आहे.गाडीत आलेला व उरलेला पोषण आहार, वाटप करणारी एजंसीच विक्री करते. यात एजंसी, मुख्याध्यापक तथा जबाबदारी असणारे शिक्षक आणि केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी तसेच आणखीही काही अधिकारी सहभागी असल्याची कुजबूज सुरू आहे. या सर्वांना शालेय पोषण आहारात किती गोलमाल आहे याची संपूर्ण माहिती असते. मात्र धनिरामच्या लालचेपोटी कोणी यात काय गौडबंगाल आहे यावर भाष्य करीत नाही. ही परंपरा सर्वच शाळेत सुरू आहे. जिल्हा परिषदस्तरावर समिती गठीत करुन वाटपानंतर व उपयोगात पोषण आहार आल्यानंतर किती साठा शाळेत उपलब्ध आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे.नियमानुसार एका विद्यार्थ्यांमागे एका दिवसाला किती तांदुळ, दाळ, तेल व इतर सामान देणे आहे हा ठरविलेला कार्यक्रम आहे. प्रत्यक्षात नियमाने शालेय पोषण आहार शिजविला जात नाही. काही विद्यार्थी पोषण आहार घेत नाही. काहीची अनुपस्थिती असते व प्रमाणात पोषण आहार शिजविला जात नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहार मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतो. शिल्लक पोषण आहारावरच सर्वाचा डोळा असतो. काही शाळेत पोषण आहारावरुन शिक्षक व मुख्याध्यापक यांचे भांडण झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. खाजगी शाळेत मुख्याध्यापक हाच सर्वेसर्वा असल्याने तो कोणाला विकतो, कसा खातो हे काही कर्मचाऱ्यांना माहित असूनही ते बोलत नाही. मात्र केंद्रप्रमुख याचा शालेय पोषण आहाराचा महिना मुख्याध्यापकाकडून किती घ्यायचा हा ठरलेला असतो. याच उरलेल्या पोषण आहारावर अनेक मालामाल झाले. तसेच वाटप करणाऱ्या एजंसीचे वारेनारे झाले. ही वाटप पद्धती बदलविणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)