शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिलासादायक। १५८० रूग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यातील कोविड योद्धा । १६ तारखेला सर्वाधिक ३८५ रूग्ण ठणठणीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी टेंशन वाढविणारा ठरल्याचे दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २६३६ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. शिवाय तब्बल ३६ रूग्णांचा जीवही याच महिन्यात गेला आहे. असे असतानाही याच महिन्यात १५८० रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या कोविड योद्धांच्या माध्यमातून एक दिलासादायक आकडेवारीही याच महिन्यात आली आहे.जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे. असे असतानाही रूग्ण संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या रूग्ण संख्येत ५० टक्के पेक्षा जास्त रूग्ण व मृतांचा आकडा हा फक्त सप्टेंबर महिन्यातील आहे.सप्टेंबर महिन्यातील ही आकडेवारी बघितल्यास शुक्रवारपर्यंत (दि.१८) जिल्ह्यात तब्बल २६३६ कोरोना बाधित रूग्ण वाढले आहेत. तर सोबतच ३६ रूग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. यामुळे सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरला आहे. असे असतानाच मात्र सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत तब्बल १५८० रूग्णांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. यामुळे रूग्णांच्या आकडेवारीत वाढ असल्याने टेंशन वाढविणारा सप्टेंबर महिना तेवढ्यात प्रमाणात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या कोरोना योद्धांमुळे दिलासादायक ही ठरला आहे.मास्क करणार आपली सुरक्षाकोरोनाच्या या लढाईत शारीरिक अंतर व मास्कचा नियमित वापर हे २ शस्त्र माणसाच्या हाती आहेत. त्यातही मास्कमुळे आजघडीला आपण सर्वाधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर्सही सांगत आहेत. त्यामुळे हा माझा मित्र, हा माझा सहकारी, हा माझा नातेवाईक या गोष्टी बाजूला सारून कुणाच्याही संपर्कात येण्यापूर्वी मास्क लावण्याची गरज आहे.घरीच राहण्याची गरजसध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. या जनता कर्फ्यूला बाजारात चांगला प्रतिसाद असतानाच शहरातील अन्य भागांत मात्र प्रतिसाद दिसून येत नाही. मात्र नागरिकांनी घरीच राहून स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. शहरातील प्रत्येकच भागात कोरोना रूग्ण निघून येत असल्याने अधिकच सावधान राहण्याची आता खरी गरज आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या