शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

युरियासाठी संयुक्त खताची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

शेतीच्या वाढत्या लागवड खर्चामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता खतविक्रेत्या कंपन्याकडून लिकिंग केली जात असल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आरसीएफ कंपनीकडून युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खताची सक्ती केली जात असल्याची तक्रार विक्रेते व शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच कृषी विभागाकडे केली होती.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  दरवर्षी खरीप हंगामात खतविक्रेत्या कंपन्याकडून लिंकिंगचा प्रकार केला जातो. यंदा सुद्धा असाच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. २५७ रुपयांच्या युरिया खतांवर १,१८५ रुपयांची १,५१,५१० खत घेण्याची सक्ती आरसीएफ कंपनीकडून केली जात असल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लिंकिंगचा प्रकार सुरूच असल्याच्या प्रकारावर शिक्कामोर्तब झाले आहे. शेतीच्या वाढत्या लागवड खर्चामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता खतविक्रेत्या कंपन्याकडून लिकिंग केली जात असल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आरसीएफ कंपनीकडून युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खताची सक्ती केली जात असल्याची तक्रार विक्रेते व शेतकऱ्यांनी आठ दिवसांपूर्वीच कृषी विभागाकडे केली होती. यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि सहायक जिल्हा कृषी अधिकारी मडामे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र संचालक आणि आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.  यात कृषी केंद्र संचालकांच्या तक्रारीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आरसीएफ कंपनीला स्टॉफ सेलचे आदेश दिले. त्यानंतर मडामे यांनी स्टॉफ सेल केला होता. मात्र शनिवारी (दि.७) आरसीएफ कंपनीची गोंदिया येथे रॅक लागली. तेव्हा कंपनीने पुन्हा विक्रेत्यांना युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खत घेण्याची सक्ती केली. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. कृषी अधिकाऱ्यांनी खतावरील लिकिंग बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने विक्रेत्यांनी यावर संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे आरसीएफ कंपनीला स्टॉफ सेलचे आदेश मडामे यांनी दिले होते. त्यानंतर ५ ऑगस्टला मडामे यांनीच आरसीएफ कंपनीला रिलीज ऑर्डर दिले. हे रिलीज ऑर्डर देताना त्यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे. 

 निर्णय ५ टनाचा वितरण १५ टनचे जि. प. कृषी अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आरसीएफ कंपनीला युरियाची रॅक लागल्यानंतर सर्वच कृषी केंद्र संचालकांना प्रत्येकी पाच टन युरिया खत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शनिवारी (दि.७) युरिया खताची रॅक लागल्यानंतर या निणर्याचे सुद्धा उल्लंघन करण्यात आले. सडक अर्जुनी तालुक्यातील एका कृषी केंद्राला १५ टन युरिया खताचा पुरवठा केला. कंपनीने हे कुठल्या आधारावर केले याची सुद्धा माहिती नाही.  

 

टॅग्स :agricultureशेती