शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी कलेक्टर ग्राऊंडवर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. अशा कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. अशा कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण करून त्याची अतिरिक्त दराने विक्री केली जात असल्याची ओरड वाढली आहे. याचीच दखल घेत कलेक्टर, सीईओ, डीएचओ यांनी शुक्रवारी (दि. ९) सकाळीच थेट शहरातील मेडिकल दुकानांमध्ये धडक देत रेमडेसिवीरचा स्टॉक चेक केला. तसेच मेडिकलची पाहणी केली अचानक दिलेल्या भेटीमुळे मेडिकल चालकांमध्ये खळबळ उडाली होती.

गोंदिया जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या संख्येतसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा काही मेडिकल चालक घेत असून तुडवडा निर्माण करून अतिरिक्त दाराने त्याची विक्री करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरातील जे स्टाॅकिस्ट आहेत त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून ठेवावा, त्याची माहिती वेळोवेळी प्रशासनाला द्यावी यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता थेट शहरातील मेडिकल दुकानांना भेट देऊन रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना संबंधित औषधांचा साठा किती उपलब्ध आहे, याची तपासणी केली. तसेच अतिरिक्त स्टॉक उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देत अतिरिक्त दराने रेमडेसिवीर व इतर औषधांची विक्री केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन मेडिकलच्या दुकानातील संगणकातील स्टॉकचीसुद्धा पाहणी केली. दरम्यान, या धडक मोहिमेमुळे मेडिकल चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी त्यांच्यासोबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, डीएचओ डॉ. नितीन कापसे, उपविभागीय अधिकारी वंदना संवरगपते, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारीसुद्धा उपस्थितीत होते.

........

अतिरिक्त दराने विक्री केल्यास थेट तक्रारी करा

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी संपूर्ण राज्यभरातच मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून लूट केली जात आहे. यासंबंधीच्या तक्रारीतसुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा रेमडेसिवीर इंजेक्शन, मास्क यांची अतिरिक्त दराने विक्री करणाऱ्यांची थेट माझ्याकडे तक्रार करा, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी नागरिकांना आवाहन केले.

...........

कोट

काेरोना संसर्गात वेगाने वाढ होत आहे. यामुळे रेमडेसिवीर कोरोनावरील औषधांची मागणी वाढली आहे. पण या संधीचा फायदा घेत औषधांचा काळाबाजार केला जात आहे. मात्र हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून काळाबाजार करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नाही, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल.

- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी.