शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोहारे कुटुंबावरील संकटाला धावून आले जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याची दखल घेत संकटातील मोहारे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय प्रतिसाद देत असून, एकूण २० अधिकाऱ्यांकडून दरमहा ५०० रुपयेप्रमाणे दर महिन्याला १० हजार रुपये पीडित मोहारे कुटुंबाला देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली तरी मोहारे कुटुंबीयांना दरमहा दहा हजार रुपयांची मदत सुरूच राहणार आहे. 

ठळक मुद्दे२० वरिष्ठ अधिकारी मिळून देणार दरमहा १० हजार रुपये : लोकमतच्या वृत्तानंतर सुरू झाला मदतीचा ओघ

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील मुंडिपार येथे सर्पदंशाने माय-लेकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबात दोन बहिणींच्या वाट्याला अंधार आला.  त्यात त्यांच्यावर दिव्यांग वडिलांची जबाबदारी शिक्षण घेण्याच्या वयात दोन्ही बहिणींवर आली. ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात यासंबंधीचे वृत्त प्रकाशित करताच गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याची दखल घेत संकटातील मोहारे कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय प्रतिसाद देत असून, एकूण २० अधिकाऱ्यांकडून दरमहा ५०० रुपयेप्रमाणे दर महिन्याला १० हजार रुपये पीडित मोहारे कुटुंबाला देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली तरी मोहारे कुटुंबीयांना दरमहा दहा हजार रुपयांची मदत सुरूच राहणार आहे. १३ जूनला मोहारे कुटुब एकाच ठिकाणी जमिनीवर झोपले असताना दांडेकर सापाने सतवंती मोहारे आणि मुलगा दीपक मोहारे यांना दंश केल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात दोन बहिणी आणि त्यांचे दिव्यांग असलेले वडील राहिले. त्यामुळे पीडित मोहारे कुटुंबातील त्या दोन बहिणींचे भविष्य संकटात आले. लोकमतने या घटनेची सविस्तर बातमी १७ जूनच्या अंकात प्रकाशित केली. लोकमतमधील बातमी वाचून जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे मन हेलावले. यानंतर त्यांनी लोकमतमधील बातमी विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि फेसबुुकवर शेअर केली. तसेच मोहारे कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लगेच प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमत प्रतिनिधीला फोन करून माेहारे कुटुंबीयांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल आभार मानले. तसेच या कुटुंबाला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. 

२० अधिकाऱ्यांनी उचलला मोहारे कुटुंबीयांचा भार - मोहारे परिवाराला दर महिना ५०० रुपये प्रमाणे २० अधिकाऱ्यांकडून एकूण १० हजार देण्यात येणार आहेत. यामध्ये अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, निवासी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, उपविभागीय अधिकारी तिरोडा, उपविभागीय अधिकारी गोंदिया, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड गोंदिया, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा नियोजन अधिकारी, प्रकल्प अधिकारी आयटीडीपी देवरी, जिल्हा हिवताप अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास या सर्व अधिकाऱ्यांचा समावेश आहे.इतर संघटनाही सरसावल्या- मोहारे कुटुंबाला सध्याच्या अडचणीतून सावरण्यासाठी जिल्हा आणि तालुक्यातील इतर सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. यात लोकमत सखी मंच, सालेकसा, शिक्षक संघटना आणि समाजसेवकांचा समावेश आहे. मोहारे कुटुंबाची व्यथा मांडून मदत केल्याबद्दल लोकमतचे आभार मानले. दोन बहिणींच्या शिक्षणाची व्यवस्था हाेणार - आईचे छत्र हरपल्याने मोहारे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. त्यातच दोन बहिणींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हा प्रश्नसुध्दा सोडविण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून या दोन्ही बहिणींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी यांच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा अजूनही जिवंत आहे, हे आज या प्रसंगातून दिसून आले. उदात्त कार्यासाठी पुढे आल्याबद्दल सर्वांचे आभार मानून भविष्यात एखादे कुटुंब अडचणीत सापडलेले वाटेल तेव्हा इतर आणखी अधिकारी पुढे येऊन मदतीचा हात पुढे करतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. - राजेश खवले, जिल्हाधिकारी, गोंदिया

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी