शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी पीक कर्ज वाटपावरून कलेक्टर आले ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

पालकमंत्री नवाब मलिक यांनी गोंदिया येथे २५ जून रोजी बैठक घेऊन पीककर्ज वाटपासंबंधाने आढावा घेतला होता. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यामध्ये कुचराई करतील, अशा बँकांमध्ये शासकीय ठेवी ठेवल्या जाणार नाहीत, असे आदेश दिले होते. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांना वारंवार या संदर्भात सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ५ जुलै रोजी पीककर्ज वाटपाच्या संदर्भाने बँकांचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे१० बँकांना कारणे दाखवा नोटीस : शासकीय खाते बंद करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देऊनसुद्धा राष्ट्रीयीकृत बँकांकडून त्याचे पालन न झाल्याने जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी १० बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या बँकांमध्ये असलेले विविध शासकीय विभागांचे खातेसुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथमच बँकांना चपराक बसल्याचे चित्र आहे.पालकमंत्री नवाब मलिक यांनी गोंदिया येथे २५ जून रोजी बैठक घेऊन पीककर्ज वाटपासंबंधाने आढावा घेतला होता. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यामध्ये कुचराई करतील, अशा बँकांमध्ये शासकीय ठेवी ठेवल्या जाणार नाहीत, असे आदेश दिले होते. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांना वारंवार या संदर्भात सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ५ जुलै रोजी पीककर्ज वाटपाच्या संदर्भाने बँकांचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील काही बँकांची पीककर्ज वाटपाची टक्केवारी दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत कमी होती. अशा १० बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीककर्ज देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या बँकांवर कारवाई करीत या बँकांमध्ये असलेले शासकीय खाते बंद करण्यासाठी महसूल प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांना पत्र काढून शासकीय ठेव अन्य राष्ट्रीयीकृत बँकांत हलविण्याबाबत सूचना केल्या आहेत. 

१८० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप - जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटींचे पीककर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास १८० कोटी रुपयांचे म्हणजे ६० टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील काही बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

पीककर्ज मेळावे घेऊन उद्दिष्ट पूर्ण करा - पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी पीककर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी खवले यांनी दिले आहेत. खरीप हंगामाकरिता पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यास संबंधित बँकांमध्ये असलेली शासकीय ठेव अन्य राष्ट्रीयीकृत बँकांत हलविण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जcollectorजिल्हाधिकारी