शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळे आर्थिक बचतीचे माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:27 IST

आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : साखरीटोला येथे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांचे आपसात आपुलकी आणि प्रेम वाढते. यातून समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. अशा आयोजनाकरिता समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तसेच अशा सामूहिक सोहळ्यातून समाजातील लोकांची आर्थिक बचत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.साखरीटोला येथे युवा कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने रविवारी (दि.१५) जि.प. हायस्कूलच्या पटांगणावर कुणबी समाजाच्या १४ वर-वधू जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, माजी खा. नाना पटोले, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ. राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, उषा मेंढे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, नरेश रहिले, सालेकसाचे उपसभापती दिलीप वाघमारे, देवरीच्या सभापती सुनंदा बहेकार, सातगावचे सरपंच संगीता कुसराम, गणेश शिक्षण संस्थेचे संस्थापक विजय बहेकार, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सभापती रमेश ताराम, हुकुमचंद बहेकार यांच्यासह इतर समाजबांधव, महिला, पुरुष, युवक व वऱ्हाडी बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी माजी खा. नाना पटोले यांनी, या देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. त्यांनी शेतात रोवलेल्या बियांचा खर्च निघत नाही आणि त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता समाजाने व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता लढणे गरजेचे आहे, असे म्हटले. तर आ. गोपालदास अग्रवाल यांनी समाजाचे महत्व पटवून देताना संघटीत समाजासमोर सरकारही झुकते आणि या माध्यमातून आपला विकास साधता येतो, असे सांगितले.या वेळी विवाहबद्ध झालेल्या १४ वर-वधू जोडप्यांना मनोहरभाई पटेल अ‍ॅकादमी, प्रताप मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्यातर्फे भेटवस्तू वाटप करुन उपस्थित अतिथींनी सुखी सांसारिक जीवनाबद्दल आशीर्वाद दिले. प्रास्ताविक युवा कुणबी समाज समितीचे अध्यक्ष देवराम चुटे यांनी मांडले. संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. आभार सचिव पृथ्वीराज शिवणकर यांनी मानले.