शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासेस, आठवडी बाजारांना ग्रीन सिग्नल, आता मंदिरे उघडण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. यामुळे भाजीविक्रेत्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा याचा फटका बसत होता. तर आठवडी बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होतो. तो सुद्धा आठवडी बाजार बंद असल्याने बुडत होता. त्यामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसत होता. कोरोनामुळे आधीच ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया ::  कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, यात कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजारावरील निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी मंगळवारी (दि.१०) कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. यामुळे भाजीविक्रेत्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा याचा फटका बसत होता. तर आठवडी बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होतो. तो सुद्धा आठवडी बाजार बंद असल्याने बुडत होता. त्यामुळे ग्रामपंचायतींना आर्थिक फटका बसत होता. कोरोनामुळे आधीच ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. त्यातच आठवडी बाजार बंद असल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागत होते. तर ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजारातूनच दैनंदिन आवश्यक वस्तू आणि भाजीपाल्याची खरेदी करीत असतात; पण बाजार बंद असल्याने त्यांना सुद्धा अतिरिक्त पैसे मोजून भाजीपाला खरेदी करावा लागत होता. त्यामुळेच कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आठवडी बाजार पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली जात होती. याचीच दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश काढून आठवडी आणि गुरांचे बाजार ५० टक्के क्षमतेने नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली. तर कोचिंग क्लासेससुद्धा मागील दीड वर्षापासून बंद होते. त्यामुळे कोचिंग क्लासेस संचालक आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. मात्र, कोचिंग क्लासेस, शासकीय, निमशासकीय, खासगी प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, संगणक प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू करण्या परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवारपासून (दि.११) करण्यात येणार आहे. या सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. समित्यांची राहणार नजर- जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच यात नियमांचे पालन केले जावे यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दिली असून समितीदेखील गठित केली आहे. शहरी भागात उपविभागीय अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांच्यावर तर ग्रामपंचायत स्तरावर पोलीस निरीक्षक, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई- कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देताना त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी करून कारवाई करण्याची जबाबदारी समितीवर सोपविली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार