शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोच राहणार आॅल टाईम नीट अ‍ॅन्ड क्लिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:51 IST

रेल्वे गाड्यांच्या कोचमधील साफ सफाईचा मुद्दा बरेचदा प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. बऱ्याच प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांना व्टिट करुन कोचमधील स्वच्छतेचा मुद्दा निदर्शनास आणून दिला.

ठळक मुद्देप्रत्येक कोचसाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी : ९ गाड्यांमध्ये सुविधेला सुरुवात

ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे गाड्यांच्या कोचमधील साफ सफाईचा मुद्दा बरेचदा प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. बऱ्याच प्रवाशांनी रेल्वे मंत्र्यांना व्टिट करुन कोचमधील स्वच्छतेचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. त्यानंतर रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेची बाब गांर्भियाने घेत गाडी सुटणाऱ्या ठिकाणापासून ते शेवटच्या स्थानकापर्यंत कोचमध्ये स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र सफाई कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रेल्वेचे कोच आता ‘स्टॉर्ट टू एन्ड पर्यंत नीट अ‍ॅन्ड क्लिन’ राहणार आहे.दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागातर्फे रेल्वे प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र रेल्वे गाड्यांमधील स्वच्छतेच्या मुद्यावरुन रेल्वे प्रशासनाला नेहमीच प्रवाशांच्या रोषाला समोर जावे लागत होते. सर्वसाधारण आणि एसी कोच ची एकदा गाडी सुटण्याच्या ठिकाणावरुन साफसफाई केल्यानंतर पुन्हा केली जात नव्हती. त्यामुळे गाडीच्या शेवटच्या स्थानकांपर्यंत प्रवाशांना कोचमधील केरकचऱ्यासह प्रवास करावा लागत होता. प्रवासासाठी पैसे मोजून देखील असुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता.रेल्वे प्रशासनाने उशीरा का होईना कोचच्या स्वच्छतेचा मुद्दा गांर्भियाने घेतला. तसेच गाडीमध्ये प्रत्येक कोचसाठी स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. गाड्यांमध्ये ‘आॅन बोर्ड हॉस्पीटीलीटी सव्हिर्स’(ओबीएचएस) ही सेवा सुरू केली आहे.ओबीएचएस सेवेअतंर्गत सफाई कर्मचारी रेल्वे गाड्यांमध्ये चौवीस तास उपलब्ध राहणार असून प्रत्येक स्टेशननंतर प्रत्येक कोचची साफसफाई करणार आहेत. या सफाई कर्मचाºयांना रेल्वे विभागातर्फे प्रशिक्षण व ड्रेसकोड व सफाईचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.टप्प्याटप्याने सर्वच गाड्यांमध्येदक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने सुरूवातीला ओबीएचएस ही सुविधा ९ एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू केली आहे. यानंतर टप्प्या टप्याने ही सुविधा सर्वच एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.सुरुवातीला ९ एक्सप्रेस गाड्यात ओबीएचएसदक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने ओबीएचएस ही सुविधा बिलासपुरवरुन सुटणाऱ्या ९ एक्सप्रेस गाड्यांमध्ये सुरू केली आहे. छत्तीसगढ एक्सप्रेस, नर्मदा एक्सप्रेस, इंटरसिटी शिवनाथ एक्सप्रेस, बिलासपुर चेन्नई एक्सप्रेस, बिलासपुर भगत कोठी एक्सप्रेस, बिलासपुर बीकानेर एक्सप्रेस, बिलासपुर पटना एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.एसएसएसवर तक्रारीची सुविधारेल्वे गाड्यांमधील कोचमध्ये केरकचरा असल्यास किंवा साफ सफाई करण्यास सफाई कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यास त्याची तक्रार प्रवाशांना ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करता येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ही सुविधा सुरू असणार आहे.