शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांचा तहसील कार्यालयाला घेराव

By admin | Updated: May 14, 2017 00:21 IST

ग्राम पंचायत किकरीपार येथील रोहयोच्या कामात रोजगार सेवकाकडून अनियमता होत असल्याने मजुरांनी तहसील कार्यालयाचा घेराव करून

 ग्रा.पं.किकरीपार : रोजगार सेवकाकडून कामात कसूर लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : ग्राम पंचायत किकरीपार येथील रोहयोच्या कामात रोजगार सेवकाकडून अनियमता होत असल्याने मजुरांनी तहसील कार्यालयाचा घेराव करून रोजगार सेवकावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. आमगाव तालुक्यातील किकरीपार ग्रा.पं.अंतर्गत रोहयोचे कामे सुरु आहेत. गावात पाण्याचा साठा उपलब्ध राहावा आणि गावातील मजूर वर्गाला रोजगार मिळावा या दृष्टीने कालव्याची सफाई करण्यासाठी १३ मे रोजी गावकरी कामाच्या ठिकाणी पोहचले तेव्हा काम बंद असल्याचे कळले. रोजगार सेवकाला विचारल्यावर मस्टर काढण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने किकरीपार येथील १३ मे करीता कामाकरीता मजूरी मिळाली नाही. तशी सूचना एक दिवसाअगोदर रोजगार सेवक तेजराम मेंढे यांनी मजुरांना दिली नाही. त्यामुळे आजच्या रोजीचे काय? असा प्रश्न मजुरांना पडला.कामाच्या ठिकाणी छावणी सुध्दा लावण्यात आली नाही, त्यामुळे सत्या असलेल्या प्रखर उन्हात विश्रांतीसाठी लावणीची गरज आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी प्रथमोपचार पेढी अस्तीत्वात नाही. उन्हाच्या तडाख्यात अनेक महिला मजूर भोवळ येऊ पडतात. पण रोजगार सेवकांनी या मुलभूत साधनांची पुर्तता केली नाही. काही दिवसापूर्वी येथील महिला मजूर माधुरी माधोराव मेश्राम यांची अचानक प्रकृती बिघडली व तेव्हा प्रथमोपचार न देता ग्रामीण रुग्णालयात हलविण्याची पाळी आली. शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसंदर्भात मजुरांसाठी व महिलेसाठी अनेक मुलभूत गरजेची तरतूद केली. पण संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी, छावणी, प्रथमोपचार इतर साधना दिसून येत नाही. याकडे तहसीलदार यांचे दुर्लक्ष होत आहे. याकरीता जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील कामांचे निरीक्षण करावे अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे. किकरीपार येथील कामावरील मजुरांची मजूरी समाधानकारक निघत नसल्याने रोजगार सेवक तेजराम मेेंढे व अभियंता अनिल शिवणकर, यांच्यावर रोष व्यक्त केला. रोहयोच्या कामात हप्त्यात कामाची मोजणी करण्यात यावी, अश्या सूचना नायब तहसीलदार राजेश वाकचौरे यांनी दिली. सदर कार्याला मजुरांकडून पैसे घेऊन आपल्या मर्जीतले मजूर कामावर घेणे, मजूरीत वाढ करणे असे प्रकार रोजगार सेवकांकडून होत असल्याचे बाबू मेंढे यांनी सांगितले. शासकीय कामाच्या उद्दिष्टपूर्तीकरीता आणि मजुरांच्या कुटुंबाला रोजगार मिळावे या धोरणातून गावात कामे सुरु असतांना तिव्र उन्हात मजूर वर्गावर अन्याय होत आहे. याकरीता जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी सुरेश बिसेन, सुखचंद बिसेन, तिलकचंद सोनवाने, बाबू मेंढे, मानिक बिसेन, सुभाष सोनवाने, परसराम नेवारे, रामचंद सोनवाने, रमेश भिमटे, मुलचंद राऊत, दुर्गेश गौतम, राजाराम सोनवाने, पाडुरंग सोनवाने, दुलन बिसेन, सरिता सोनवाने, प्रमिला चौधरी, सविता बिसेन, दुर्गेश्वरी बिसेन, ललिता बिसेन, जानेश्वरी बिसेन, द्वारका सोनवाने, आशा बिसेन, उर्मिला बंसोड व शेकडो महिलांनी केली आहे. रोहयोच्या कार्यात रोजगार सेवक कसूर ठेवत असल्याचे मजुर वर्गानी लेखी निवेदन दिले आहे. त्यात कामावर मुलभूत साधणे असायलाच हवी ते सेवकाकडून होत नसल्याचे निदर्शनात आले आहे. मस्टर तयार नसल्यास काम बंद असल्याची सुचना मजुरांना रोजगार सेवकांनी दिली नाही. याकरीता सरपंच व सचिवांनी तत्काळ कारवाईसाठी सभा घ्यावी अशी सूचना देण्यात येईल. आपल्या कार्यालयात दोनच आॅपरेटर असल्याने संपूर्ण तालुक्याचे मस्टर तयार करणे त्यांची जवाबदारी आहे. त्यामुळे मस्टर वेळेवर तयार करण्यास विलंब होत आहे. मजुरांना न्याय मिळाव याकरीता प्रशासन प्रत्यक्ष कामांची पाहणी करीत आहे. आर.जे.वाकचौरे, नायब तहसीलदार, आमगाव