शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातील कडधान्य पुरवठा बंद

By admin | Updated: February 5, 2017 00:06 IST

राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना

विद्यार्थ्यांना फटका : मध्यान्ह भोजनापासून वंचित केशोरी : राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन देण्याची योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र खाद्य निगम मुंबई यांचेद्वारा कंत्राटदारामार्फत पोषण आहाराचे कडधान्य पुरवठा न केल्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील शाळामधील विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित आहेत. याकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकारी लक्ष न देता चुप्पी करुन बसले आहेत. शालेय पोषण आहाराअंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी तांदूळ, डाळ, हरभरा, वटाणा या साहित्याचे वाटप करण्याचे कार्य शासनाने कंत्राटदारांना दिले आहे. त्याप्रमाणे मुख्याध्यापक दररोज पोषण आहाराचे साहित्य येईल याची वाट पाहत असतात. काही दिवसापर्यंत शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. मात्र गेल्या २० दिवसांपासून अजूनही पोषण आहाराचे धान्य शाळांमध्ये पोहचले नाही. परिणामी विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित राहत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा झाल्याशिवाय राहणार नाही. काही शाळांमध्ये बऱ्याच दिवसापर्यंत काटकसर करुन पोषण आहार साहित्य पुरवून मध्यान्ह भोजन विद्यार्थ्यांना दिले गेले. परंतु काही अशा शाळा आहेत की त्यांचेजवळ कोणतेच साहित्य शिल्लक नसल्याने ते विद्यार्थ्याना काहीच देऊ शकत नाही किंवा कोणाकडून उसनवार साहित्य घेऊ शकत नाही. तालुक्यात परिस्थिती सारखीच आहे. शाळांतील मुख्याध्यापकांनी पर्यायी व्यवस्था करुन काही दिवस पोषण आहार सुरू ठेवला होते. आता तर त्यांच्याजवळ कोणताच पर्याय उरला नाही. याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन त्वरित मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असणाऱ्या कडधान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. (वार्ताहर)