शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

खासगीकरण-फ्रँचाईसीचे धोरण बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:25 IST

शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीच्या खासगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्यावतीने सोमवारपासून (दि.७) तीन दिवसीय संप करण्यात येत आहे. यांतर्गत येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी गेट मिटींग घेऊन शासन व प्रशासन विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.

ठळक मुद्देवीज कर्मचारी कृती समिती : कर्मचारी तीन दिवसीय संपावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीच्या खासगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी वीज कर्मचारी अभियंता संघटना कृती समितीच्यावतीने सोमवारपासून (दि.७) तीन दिवसीय संप करण्यात येत आहे. यांतर्गत येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी गेट मिटींग घेऊन शासन व प्रशासन विरोधात घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटना, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीस वर्कस फेÞडरेशन, विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस यांच्या संयुक्तवतीने वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती या बॅनरखाली हा संप पुकारण्यात आला आहे. या संपांतर्गत सोमवारी (दि.७) येथील रामनगर कार्यालयासमोर कर्मचाºयांनी गेट मिटींग घेतली.या मिटींगमध्ये आपल्या मागण्यांवर चर्चा करीत शासन व प्रशासनाविरोधात घोषणा देत कर्मचाºयांनी रोष व्यक्त केला. कर्मचारी विरोधी धोरणाला घेवून पुकारण्यात आलेल्या संपामुळे वीज कंपनीचे कामकाज ठप्प पडले आहे. या तीन दिवसीय संपात जिल्ह्यातील सुमारे १४०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.गेट मिटींगमध्ये सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे सहसचिव कुमार कोकणे, महावितरण वीज कामगार महासंघाचे सहसचिव योगेश्वर सोनुले, महा. स्टेट इलेक्ट्रीक वर्कर्स फेडरेशनचे सचिव विवेक काकडे, खुशाल सोनी, सुनील रेवतकर, सुनील मोहुर्ले, गणेश चव्हाण, विजय चौधरी, अशोक ठक्कर, विनोद चौरागडे, कृष्णा बडवाईक, आर.डी.फुलमाळी, सुनील बांते, एस.बी.रहांगडाले, प्रतिभा मेंढे, ओमेश्वर रहांगडाले, लुकेश्वरी टेंभरे, शंभरकर यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.या आहेत समितीच्या मागण्यामहापारेषण कंपनीतील स्टाफ सेटअप लागू करताना आधीचे एकूण मंजूर पदे कमी न करता अंमलात आणा, महावितरण कंपनीतील प्रस्तावीत पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणा, शासन व व्यवस्थापन राबवित असलेले महावितरण कंपनीचे खाजगीकरण-फॅ्रँचाईसीकरणाचे धोरण त्वरीत थांबवा, मुंब्रा, शिळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फॅ्रँचाईसीवर खासगी भांडवलदार कंपनींना देण्याची प्रक्रिया त्वरीत थांबवा, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत लघु जल विद्युत निर्मित संचाचे शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे, महानिर्मिती कंपनीच्या २१० मेगावॉटचे संच बंद करण्याचे धोरण त्वरीत थांबवावे, महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने तिन्ही कंपन्यांतील कर्मचाºयांकरिता मान्य केलेली राज्य शासनाच्या जुन्या पेंशन योजनेच्या पार्श्वभूमिवर पेंशन योजना लागू करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे त्वरीत भरा, तिन्ही कंपन्यांतील बदली धोरणाचा पुनर्विचार संघटनेसोबत चर्चा करून राबवा, कंत्राटी व आऊटसोर्सींग कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्या, व समान काम, समान वेतन बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करावा या मागण्यांसाठी वीज कर्मचाºयांनी संप पुकारला आहे.