शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवनपूत्र मिनरल्स कारखाना बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:19 IST

गोरेगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे सुरु असलेला श्री पवनपूत्र मिनरल्स कारखाना हा आता गावात ध्वनी, वायु व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम पडत आहेत.

ठळक मुद्देकालीमाटी येथील प्रकार : पालकमंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे सुरु असलेला श्री पवनपूत्र मिनरल्स कारखाना हा आता गावात ध्वनी, वायु व जलप्रदुषणाचे कारण ठरत आहे. यामुळे येथील गरीब जनतेच्या आरोग्यावर परिणाम पडत आहेत. करीता या कारखान्याला बंद करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत पारीत करण्यात आला आहे. तसेच गावकरी, जि.प. शाळा व विद्या प्रसारण हायस्कूलकडून जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्यात आले. तसेच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनाही निवेदन देण्यात आले आहे.श्री पवनपूत्र मिनरल्स या कारखान्यात मोठमोठ्या मशीन आल्या आहेत. यात बाहेरुन काळ्या प्रकारचे मॅगनिज मिश्रीत दगड व कच्चामाल जड वाहनांनी आणला जातो. यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मॅग्नीज मिश्रीत दगड व कच्चामाल मोठमोठ्या टाक्यात धुतला जात असून यापाूसन निघणारे काळे गढूळ पाणी तलावात जात आहे. त्यामुळे तलावातील पाणी दुषित होवून निरुपयोगी झाले आहे. मॅगनिज मिश्रीत दगडांना मशीनद्वारे चुरा केले जाते व यामुळे निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे गावात ध्वनीप्रदूषण वाढले आहे.दगड चुरा करण्याच्या प्रक्रियेतून निघणारी धूळ हवेत मिसळून विहिरीत जाते व घरांवर साचते. यामुळे पिण्याचे पाणी दुषित होवून आरोग्यावर परिणाम पडत आहे. सदर कारखान्याला सन २०१४ मधील ग्रामसभेत गावकऱ्यांकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये असे स्पष्ट झाले होते. तरिही गावकºयांना माहिती न करता गुप्तपणे सन २०१४-२०१५ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाºयांनी नाहरकत प्रमाणपत्र दिले.याचे दुष्परिणाम आज कालीमाटीतील गावकरी तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे. यासाठी गावकऱ्यांनी कारखाना बंद करण्यात यावा असे निवेदन जिल्हा परिषद सभापती विश्वजीत डोंगरे यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. शिवाय तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करुन कारखाना त्वरित बंद करण्यात यावा असे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री बडोले यांनाही देण्यात आले आहे.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले