शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

किडंगीपार येथील क्रशर बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 22:26 IST

ग्राम किडंगीपार गावाशेजवरी खाजगी जमिनीत क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करावा अशी लेखी तक्रार जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुजरुक : ग्राम किडंगीपार गावाशेजवरी खाजगी जमिनीत क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. हे काम बंद करावा अशी लेखी तक्रार जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी व किडंगीपार रस्त्याशेजारी खाजगी शेत जमिनीत दगडाची खान लागली आहे. या ठिकाणी सुरुंग लावून दगड फोडले जातात व त्या मोठमोठ्या दगडांना क्रशर मशिनद्वारे बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावली जाते. दगडाला बारीक करण्याच्या प्रक्रियेमध्ये दगडाचा खूप धूर निघतो व त्यात दगड ही लांब दूरवर फेकले जातात. या दगडाच्या धुरामुळे किडंगीपार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही मशीन रात्रदिवस सुरु राहत असल्याने गावातील लोकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे.खानी शेजारील शेतकºयांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात येथील कंत्राटदाराला अनेक वेळा सांगण्यात आले, तरी सुद्धा कंत्राटदार जनप्रतिनिधी तसेच गावकºयंच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे.तसेच या सुरुंगामुळे निघणाºया दगडाच्या धुरामुळे रस्त्याने जाणाºया लोकांना याचा फटका बसत आहे. यात दगडामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाºया लोकांना धोका निर्माण झाला आहे. क्रशर मशिन व खाजगी जागेमधील दगडाची खान गावापासून २०० मिटर अंतरावर आहे. यामुळे गावातील जनता व जवळच्या शेतकºयांचा जीव धोक्यात आला आहे.या खान जवळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा रस्ता आहे. या रस्त्याची वाहन क्षमता १० ते १२ टनाची असून या रस्त्यावरुन ४० ते ४५ टनाचे ओव्हर लोड टिप्पर गिट्टी वाहून नेत आहेत. यामुळे हा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्यावर कोल्हापुरी बंधारा व पुल बांधला आहे. या पुलाची वाहन क्षमता कमी असून या पुलावरुन गिट्टीचे टिप्पर जात असल्याने हा लोकांच्या जाण्या-येण्याचा पुल केव्हाही तुटू शकतो यात दुमत नाही.अर्जुनी-किडंगीपार रस्त्यावरुन लोकांना जाण्या-येण्यास त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना वारंवार तक्रार व सुचना करण्यात आल्या. परंतु या अधिकाºयांचे याकडे मुळीच लक्ष नाही. उलट गिट्टी खोदकाम व क्रशर कंत्राटदाराला यांचे अभयदान असल्याचे दिसून येत आहे.रस्त्यावर उतरण्याचा इशाराया क्रशरमुळे शासकीय संपत्तीचे नुकसान होऊ नये व गावातील नागरिकांचे आरोग्य तसेच जिवीत हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दयावे व क्रशर मशीन तसेच सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले तसेच गावकºयांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. काम बंद न केल्यास जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी केली जात आहे.