शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १८० उद्योग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 02:17 IST

जिल्ह्यात अदानी प्रकल्प सोडला तर मोठे उद्योग नाही. परंतु छोट्या उद्योगांची नोंदणी २२५८ आहेत. मात्र यातील १८० उद्योग बंद झाले आहेत.

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात अदानी प्रकल्प सोडला तर मोठे उद्योग नाही. परंतु छोट्या उद्योगांची नोंदणी २२५८ आहेत. मात्र यातील १८० उद्योग बंद झाले आहेत. २०७८ लघु उद्योग सुरू असावेत असा अंदाज जिल्हा उद्योग केंद्राचा आहे. विशेष म्हणजे कोणते उद्योग सुरू आणि कोणते उद्योग बंद आहेत याची शहानिशा मागील सात वर्षापासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा उद्योगाच्या बाबतीत उदासीन ठरत आहे. जिल्ह्यात ३५० राईस मील, फ्लाय अ‍ॅश विटांचे २५ कारखाने, प्लास्टीकचे ४० युनिट, आरओ प्लांट १०, फेब्रीकेशन व इतर उद्योग मिळून असे २ हजार २५८ उद्योगांची नोंद जिल्हा उद्योग केंद्रात आहे. या उद्योगांचे सर्वेक्षण २००८-०९ या वर्षात केले होते. त्यावेळी सर्वेक्षणात नोंदणी असलेल्यापैंकी १८० उद्योग बंद असल्याचे लक्षात आले होते. परंतु आता सात वर्ष उलटूनही सर्वेक्षण न झाल्यामुळे सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात किती उद्योग बंद आहेत याची निश्चित आकडेवारी या कार्यालयाकडे नाही. आधी सर्वेक्षण निरीक्षक उद्योगाच्या ठिकाणी भेटी देऊन ते उद्योग सुरू आहेत किंवा नाही याची पाहणी करीत होते. परंतु निरीक्षकांचा दौरा शासनाने बंद केल्याने किती उद्योग सुरू, किती उद्योग बंद आहेत याची माहिती या उद्योग केंद्रालाच नाही. नोंदणी करण्यात आलेल्या २२५८ उद्योगांवर फक्त ९२२ कामगार कामावर असल्याची या कार्यालयात नोंद आहे. आता आॅनलाईन उद्योगांची नोंदणी करण्याचे काम सुरू असल्यामुळे या कार्यालयाला किती उद्योग आहेत हेही सांगता येणार नाही. कामगारांची माहितीच नाहीजिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक उद्योग आहेत. परंतु या उद्योगांवर काम करणाऱ्या कामगारांची नोंद फक्त ९२२ च्या घरात आहे. याचाच अर्थ हजारो कामगारांची माहिती उद्योग चालविणाऱ्यांनी या उद्योग केंद्राला दिली नाही. कामगार कायद्यांतर्गत त्या कामगारांना आर्थिक लाभ न दिल्यास मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतील हे गृहीत धरून त्या कामगारांची नोंदणी त्यांनी केली नसावी.कार्यालय फक्त मार्गदर्शनापुरतेजिल्हा उद्योग केंद्राचा लाभ आता सुशिक्षित बेरोजगारांना होणार नाही. हे कार्यालय फक्त तरूणांना मार्गदर्शन करण्याचे कार्यालय होऊन बसले आहे. परंतु मार्गदर्शन किंवा कार्यशाळा केलेल्या तरूणांना पुढची दिशा, उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे कर्ज, त्यांना बँकाकडून उपलब्ध होत नसल्यास मार्गदर्शन कामाचे नाही. आधी या कार्यालयाकडून कर्ज किंवा अर्थसहाय्य देण्यात येत होते. परंतु आता तरूणांना काहीच सहकार्य मिळत नाही. पंतप्रधान रोजगार निर्मिती रखडलीदेशातील सुक्ष्म व लघु उद्योग शहरात व ग्रामीण भागात स्थापन करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मीती योजना अंमलात आणली. परंतु या योजनेची उद्दीष्ट्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात साध्य न झाल्यामुळे यावर्षी एकाही तरूणाला उद्योगासाठी अनुदान देणार नाही असा प्रवित्रा शासनाने घेतल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.