शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था

By admin | Updated: August 20, 2014 23:36 IST

विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय

विद्यार्थ्यांची गैरसोय : आरोग्यविषयक हेळसांड थांबविण्याकडे दुर्लक्ष इटखेडा : विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा परिसर व तेथील स्वच्छतागृहे स्वच्छ असणे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक आरोग्य सुदृढ असल्याशिवाय मानसिक आरोग्य सुदृढ राहत नाही, असे म्हटले जाते. तरीही जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृहे आहेत, त्यांची अवस्था अत्यंत भयावह आहे.स्वच्छतागृहाची दारे तुटली आहेत. वरचे छप्परही जागेवर नाही. सभोवताल काडीकचरा, विटाचे तुकडे, मातीचे ढिगारे, वाढलेले गवत निदर्शनास येते. शौचास बसण्यासाठी लावलेल्या सिट्स तुटलेल्या, कोळीष्टके, रेती, विटाच्या तुकड्यांनी सिटा बुजलेल्या, पाण्याच्या सोयीचा अभाव इत्यादीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना लघवी किंवा शौचास लागली असताना त्या स्वच्छतागृहात जाता येत नाही. स्वच्छतागृहात जाणे शक्य नसल्याने मुलांना मुत्रविकार व बध्दकोष्ठतासारखे विकार बळावण्याची शक्यता असते. या साध्या बाबी लक्षात घेतल्यास शाळेने मुख्याध्यापक, व्यवस्थापन, शिक्षक, पालक व शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हेळसाड करीत असल्याचे निदर्शनास येते. शिक्षणाविषयी पालक जागरूक असले तरी ज्या शाळेत आपली मुले शिकतात. त्या शाळेतील स्वच्छतागृहे व परिसर स्वच्छ आहेत की काय याबद्दल चकार शब्द काढत नाही. विद्यार्थीही याबाबत बोलत नाही. या सर्व परिस्थितीत विद्यार्थीनीची मोठीच कुंचबना होते. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह पोषण आहार योजना कार्यान्वित केली आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी किती मुले हात धुतात, जेवण्याची ताटे स्वच्छ आहेत काय, स्वयंपाकाची भांडी, पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ आहेत काय अशा कितीतरी बाबींची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शाळा परिसर, स्वच्छतागृहे व वर्गखोल्या स्वच्छ ठेवणे अपरिहार्य आहे. अन्यथा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या वाढणार एवढे मात्र निश्चित आहे. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक हेळसांड थांबवावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)