शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

चार गावातील नागरिकांचा स्वच्छाग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:08 IST

गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकºयांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प केला.

ठळक मुद्देस्वच्छतेसाठी पुढाकार : गावकऱ्यांचा वाढतोय सहभाग, स्वच्छतेचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकऱ्यांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प केला.अदानी फाऊंडेशन तिरोडाव्दारा अदानी विद्युत प्रकल्प प्रमुख सी.पी.साहू व आँपरेशन अँन्ड मेन्टनन्स हेड अरिन्दम चटर्जी याच्यां मार्गदर्शनाखाली तसेच चन्द्रेश शुक्ला, परिबर शहा, अशोक कुमार मिश्रा व हरीप्रसाद अडथळे आणि अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यातील चुरडी, गराडा, चिखली व भिवापुर या गांवामध्ये स्वच्छाग्रह कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.कार्यक्रमातंर्गत चारही गावातील नागरिकांसह अदानी प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी स्वच्छाग्रहाची शपथ घेऊन गावाची स्वच्छता केली. तसेच गावांमध्ये विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी विविध महापुरूषांच्या वेशभुषा परिधान करुन विद्यार्थी प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. काही विधार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाला उपस्थित नागरीकांच्या हस्ते शाळा व ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छाग्रह उपक्र माविषयी सांगताना साहु म्हणाले, ज्याप्रमाणे गांधीजींची सत्याग्रह चळवळ सत्याचा आग्रह धरणारी होती त्याच धरतीवर अदानी फाऊंडेशनचा स्वच्छाग्रह हा कार्यक्र म स्वच्छतेचा आग्रह धरणारा असल्याचे सांगितले. कार्यक्रमामध्ये गांवातील महिला बचत गट, भजन मंडळ, युवक मंडळ, नागरीक तसेच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्र मासाठी सरपंच छाया रंगारी, जगदेव आमकर, दुर्गा भगत, पल्लवी भोयर, यांच्यासह सर्व ग्रामपंचायतचे उपसरपंच, सदस्य आणि गावकरी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान