शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वच्छतेचे परीक्षण होणार

By admin | Updated: January 13, 2017 01:08 IST

शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे ...

स्वच्छता सर्वेक्षण १७ पासून : शहरवासीयांच्या प्रतिक्रिया घेणार कपिल केकत गोंदियाशहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी शहरात येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हे सर्वेक्षण केले जाणार असून यासाठी त्यांचे विशेष पथक शहरात येणार आहे. अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविणयासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे. यात प्रत्येक नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. यातूनच स्वच्छता सर्वेक्षण हा नवा प्रयोग केला जात आहे. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हा प्रयोग केला जाणार असून यांतर्गत राज्यातील ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा असून यात गोंदिया शहराचीही निवड करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या १७ ते १९ जानेवारी या काळात हे स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाने विशेष पथक शहरात येणार असून ते शहरात स्वच्छता विषयक काय सुविधा उपलब्ध आहेत हे जाणून घेतील. तसेच शहरवासीयांशी संवाद साधून त्यांना आणखी काय अपेक्षीत याबाबतही जाणून घेतले जाणार आहे.