शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

गंगाबाई रुग्णालयात स्वच्छ भारत अभियान

By admin | Updated: November 3, 2014 23:28 IST

बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात राष्ट्रीत एकता दिन व भारताचे उपपंतप्रधान स्व. वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले.

गोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात राष्ट्रीत एकता दिन व भारताचे उपपंतप्रधान स्व. वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. तत्पूर्वी बाई गंगाबाईचे प्रभारी व अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना व डॉक्टरांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. स्वच्छ भारत अभियानासाठी गोंदिया शहरातील सक्रिय सामाजिक संघटन बजरंग दलाचे विदर्भ प्रांत प्रमुख देवेश मिश्रा, विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रमुख ब्राम्हणकर, अभिमन्यू चतरे, बसंत ठाकूर, सागर सिक्का, महेंद्र देशमुख आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. केटीएसचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, प्रसूती तज्ञ डॉ. सायस केंद्रे, रक्तपेढी अधिकारी डॉ, सुवर्णा हुबेकर, डॉ. भावना बजारे आदी उपस्थित होते. बजरंग दलचे विदर्भ प्रांत प्रमुख देवेश मिश्रा यांनी आवाहन केले की, स्वच्छ रुग्णालयीन परिसर रुग्णांना निश्चितच आल्हाददायक वातावरण निर्मिती करून देईल. बजरंग दलातर्फे बाई गंगाबाई रुग्णालयातील गर्भवतींना व नवजात बाळांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो. समाजसेवा हिच ईश्वरसेवा आहे. यानंतर डॉ. अमरीश मोहबे यांच्या नेतृत्वात ग्रीन हॉस्पीटल-क्लीन हॉस्पीटल या थीमला अनुसरून स्वच्छ भारत अभियानात बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी भाग घेतला. बजरंग दलाच्या स्वयंसेवकांनी बी.जी.डब्ल्यू. परिसर संपूर्ण झाडून साफसफाई केली व कचऱ्याची विल्हेवाट लावली. कार्यक्रमासाठी डॉ. धाबेकर, डॉ. प्रियंका, डॉ. हुबेकर, परवेझ, अहीर, राकेश उके व अनिल गोंडाणे यांनी सहकार्य केले.केशोरी : स्थानिक नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक हलमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष केशव समरीत, प्रा. हिवराज साखरे, चरण चेटुले, नितीन लंजे, रामकृष्ण मारबते, भगवान मते, रुपराम खोब्रागडे, कैलास कोडवते, नरेंद्र काडगाये, मनोहर पाऊलझगडे, प्रा. संजय मालाधरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रथम अतिथींच्या हस्ते सरदर वल्लभभाई पटेल यांच्या तैलचित्राचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातून एकताफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विवेक आंबेडारे यांनी, संचालन प्रा. मुरलीधर मानकर यांनी तर आभार आर.एम. मारबते यांनी मानले. वंदेमातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.(प्रतिनिधी)