शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कडेला असलेली घाण करतो स्वच्छ

By admin | Updated: September 18, 2016 00:32 IST

रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्ठेवर माती व राखड घालून त्याची स्वच्छता करण्याचे कार्य एक अज्ञात व्यक्ती करीत आहे.

स्वच्छतादूत : ग्रामीण भागात देतो ‘जागा हो’चा नाराुबाराभाटी : रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्ठेवर माती व राखड घालून त्याची स्वच्छता करण्याचे कार्य एक अज्ञात व्यक्ती करीत आहे. मागील महिनाभरापासून त्याचे हे कार्य सुरू असून ‘जागा हो जागा’ असा नारा देत हा स्वच्छता दूत फिरत आहे. उघड्यावरील शौचावर लगाम लागावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र जोवर प्रत्येक व्यक्ती याबाबत ठाम होणार नाहीत तोवर या प्रकारावर आळा बसणार नाही हे सुद्धा तेवढेच खरे आहे. हाच निर्धार धरून एक युवक मागील महिनाभरापासून परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या विष्ठेवर माती व राखड टाकून त्यांना नाहीशी करीत स्वच्छेतेचे कार्य करीत आहे. सायकलवर फिरून हा युवक ‘जागा हो जागा’ चा नारा देत आपले काम करून निघून जाते. प्रसिद्धीचा हव्यास व पुरस्काराचे स्वार्थ न बाळगता हा युवक आपले करून निघून जात असल्याने त्याला स्वच्छतादूत म्हटले जात आहे. तो आपले नाव सांगत नाही, करी छायाचित्र काढू देत नाही. वृत्तपत्रातून प्रकाशझोतात यायचे नाही असे तो स्पष्ट बोलतो व काम आटोपून निघून जातो. (वार्ताहर) उघड्यावर शौच करू नका लोकांची विष्ठा स्वच्छ करण्याचे काम करीत असलेला हा युवक या कार्यासोबतच लोकांत जनजागृती करण्याचे काम करीत आहे. रस्त्यावर शौच करून नका व स्वच्छता राखा असा संदेश तो देतो. आपल्या सायकलवरून सुमारे ५० गावे पालथी घालत तो लोकांना जागृत करण्याचे पवित्र कार्य करीत आहे.