शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

शहरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 30, 2017 00:53 IST

भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत.

सहकारनगरवासी तहानलेले : महिन्याभरापासून नळाला पाण्याचा थेंब नाहीतिरोडा : भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत. ३३ वर्षे जुनी पाईपलाईन असल्याने पाण्याचा दाब वाढल्यास पाईपलाईन फुटते व ती पुन्हा आपल्यालाच दुरुस्त करावी लागते. या भितीपोटी दाब न वाढविता पाणी देणे सुरू असल्याने शहराच्या कित्येक भागात पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. सहकार नगर सारख्या काही भागात तर नळाला मागील महिन्याभरापासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. शहरात कोठेही सार्वजनिक नळ नाही. जेवढे पाणी देण्यात येते त्या पाण्याचे पैसे ग्राहक देतात. आता भारनियमन होत नाही, नदीला पाणीही भरपूर आहे. तरिही महराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून अतिरीक्त काही तास पाणी का सोडले जात नाही हा संशोधनाच विषय आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता विजेचे बिल जास्त येते असे सांगण्यात येत आहे. त्यामानाने पाण्याच्या बिलातून पैसे वसूल होत नसल्याचे सांगण्यात येते. एकही सार्वजनिक नळ नसताना सर्व पाणी मिटरधारकांकडे ग्राहकांकडे जाते व रिडिंगनुसार बिल येते.दुसरीकडे सहकार नगरात दोन-तीन महिने पाण्याचा थेंबही न घेता मिनिमम चार्जच्या नावावर १५०-१६० रुपये दरमहा घेतले जाते. पाण्याचा थेंब नसताना बिलाचे पैसे का म्हणून भरावेत व याबाबत प्राधिकरणाने सखोल चौकशी करून ज्यांच्याकडे २-३ महिने पाणी देवू शकत नाही त्यांना पाण्याचे बिल पाठवू नये असेही नागरिक बोलत आहेत. अनेक तक्रारी करुन सुद्धा प्रशासन गाढ झोपेत आहे. अधिकारी आपल्या कार्यालयात कुलरच्या हवेत गारवा घेतात. जनप्रतिनिधी मस्त लग्नात खुश असून नवीन पाईपलाईन व नळ योजना येत असल्याचे नागरिकांना गाजर देत आहेत. सहकार नगरातील बाया, मुली, मुले कमीतकमी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहीद मिश्रा वॉर्डातील काही ओळखीच्या ठिकाणी जावून पाणी आणतात. अशावेळेस तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील मुख्य चौक ओलांडावा लागतो. येथे वाहने भरधाव वेगाने धावत असतात. पाण्यासाठी जात असताना अपघात झाल्यास संतापाची लाट उसळेल. त्यावेळेस जनआंदोलनास प्रशासनाला सांभाळणे कठिण होईल ऐवढे मात्र खरे. सहकार नगर, संत कबीर वॉर्ड तसेच इतरही ठिकाणावरुन काही महिलांनी ‘घागर मोर्चा’ काढण्यासाठी कंबर कसली असून लवकरच याबाबत प्रशासनाला माहितीवजा कागदपत्रे व सुचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून साई कॉलनी परिसरात दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शहरवासीयांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीची गरजपाण्यासाठी हाहाकार माजलेला असताना टुल्लू पंप लावून पाणी खेचण्याचे प्रकार शहरात घडतात. अशात मात्र अन्य नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा होत असताना त्या वेळेत भारनियमन करण्याची गरज आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला आदेश देवून विशिष्ट काळासाठी भारनियमन करुन सर्वांना पिण्याचे पाणी मिळवून देतील एवढीच जनतेची अपेक्षा आहे.