शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शहर तणावपूर्ण शांततेत

By admin | Updated: June 17, 2015 01:38 IST

नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांची हत्या झाल्याने शहराचे वातावरण तापलेले होते. त्यात

चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त नगरसेवक लोकेश यादवला अटक तीन दिवसांनंतर बाजारपेठ उघडलीगोंदिया : नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांची हत्या झाल्याने शहराचे वातावरण तापलेले होते. त्यात सोमवारी (दि.१५) सायंकाळी माजी उपाध्यक्ष वनगरसेवक लोकेश (कल्लू) यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे तापलेल्या वातावरणात अधिकची भर पडली आहे. असे असतानाही मंगळवारी (दि.१६) शहरातील बाजारपेठ उघडल्याचे दिसले. मात्र चौकाचौकांत पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला असून शहर तणावपूर्ण शांततेत होते. शनिवारी (दि.१३) सायंकाळी छेदीलाल इमलाह यांची हत्या झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली होती. याचे पडसाद रविवारीही (दि.१४) दिसून आले. शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद दिसून आली. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने शहरातील चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. हे सर्व सुरू असतानाच सोमवारी (दि.१५) सायंकाळी पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव याला अटक केली आहे. यादव याला ताब्यात घेतल्यावर समर्थकांत रोष दिसून आला व यादव चौक परिसरात त्यांनी गर्दी केली होती. तर यादव याच्या अटकेनंतर काही अनुचित प्रकार घडतील या भीतीने व्यापाऱ्यांनी लगेच आपापली दुकाने बंद केली होती. शिवाय शहरात पुन्हा वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसून येत होती. मात्र काही अनुचित प्रकार घडले नाही. त्यामुळेच मंगळवारी (दि.१६) बाजारपेठ उघडण्यात आली होती. मागील तीन दिवस शुकशुकाट असलेल्या बाजारपेठेत मंगळवारी चहलपहल दिसून आली. मात्र कधी काय घडणार याबाबत सांगता येत नसल्याने शहर तणावपूर्ण शांततेत होते. (शहर प्रतिनिधी)यादवला २७ पर्यंत पोलीस कोठडी ४सोमवारी (दि.१५) पोलिसांनी नगरसेवक व माजी उपाध्यक्ष लोकेश यादव याला त्याच्या घरातून सायंकाळी अटक केली. छेदीलाल इमलाह यांच्या खून प्रकरणात भादंवि कलम ३०२ अंतर्गत त्याला अटक करण्यात आल्याचे कळले. न्यायालयात सादर केल्यावर त्याला येत्या २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याचा भाऊ नगरसेवक पंकज यादव हा फरार असल्याचेही कळले. यादव याला अटक करण्यात आल्याने यादव चौक परिसरासह शहरातच तणाव आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता यादव समर्थकांनी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्त ४शहरात काही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने शहरातील चौकाचौकांत पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. येथील नेहरू चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, नगर परिषद कार्यालय, चांदनी चौक यासह अन्य चौकांतही फेरफटका मारला असता पोलीस बंदोबस्त दिसला. विशेष म्हणजे शहरातील भवानी चौकात पोलिसांचे मोठे वाहनच बंदोबस्तासाठी लावण्यात आले होते. पुढे शंकर चौक ते यादव यांच्या घरापर्यंत बॅरिकेटस् लावण्यात आले होते व सी-६० चे सशस्त्र पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर दिसले. यादव यांच्या हॉटेलमध्येही पोलिसांचीच गर्दी दिसली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सी-६० च्या सहा पार्ट्या तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतून ५०० पोलीस कर्मचारी मागविण्यात आल्याची माहिती आहे.