शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना सोडले देवाच्या भरवशावर

By admin | Updated: October 10, 2016 00:37 IST

शहरात १३०० रूपये प्रती तासाने धूळ साफ करणारी मशीन आणणाऱ्यांनी हा विचार केला नाही, की रस्तेच

गोंदिया : शहरात १३०० रूपये प्रती तासाने धूळ साफ करणारी मशीन आणणाऱ्यांनी हा विचार केला नाही, की रस्तेच नाही तर ते मशीन कशावर चालविणार. शहर घाणीने माखले आहे, नाल्या बंद पडल्या आहेत, आजार आपले पाय पसरत आहे. असे असताना नगर परिषदेच्या भ्रष्ट प्रशासनाने मात्र शहरवासीयांना देवाच्या भरवशावर सोडून दिले असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. त्यांच्या स्थानिक विकासनिधीतून मंजूर छोटा गोंदियातील शास्त्री चौक हायमास्ट ते चावडी चौक रस्ता सिमेंटीकरण व शास्त्री चौक ते टेक्नीकल स्कूल पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेस कमिटी प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कोणताही जबाबदार लोकप्रतिनिधी अशा परिस्थितीत गप्प बसू शकत नाही, त्यामुळेच आम्ही आमच्याकडून शहर विकास व सुधारासाठी आपले प्रयत्न वाढवून विकास कामांचे शुभारंभ करीत आहेत. त्यामुळे क्षेत्रातील जनतेने खोटे आश्वासन देवून वाहवाही लुटणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, देवा रूसे, लक्ष्मीकांत डहाट, नफीस सिद्धीकी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार महेश बिसेन यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. सुरेश सोनी, दिनेश मिश्रा, राजेश कापसे, भारती पटले, हेमराज बिसेन, भागवत मेश्राम, संतोष कुसराम, युवराज राऊत, सुनिल पटले, किसन भगत, छोटू बिसेन, तिर्थराज उके, दीपल अग्रवाल, आनंद राहूलकर, देवेंद्र अग्रवाल, मनोज भैसारे, राजू दोनोडे, उमेश सोनवाने आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)