शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांनो वेळीच व्हा सावध! संसर्गात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गोंदिया तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनासह शहर आणि तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. शनिवारी जिल्ह्यात २२ बाधितांची नोंद झाली, तर ७ बाधितांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत.

ठळक मुद्दे२२ बाधितांची नोंद : गोंदिया तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पाॅट, वेळीच दक्षता न घेतल्यास होवू शकतो विस्फोट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :गोंदिया शहर आणि तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.२७) आणखी गोंदिया तालुक्यात १९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९६ वर पोहोचली असून हा तालुका कोरोनाचे हॉटस्पाॅट होत चालला आहे. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा ही बाब शहरवासीयांनाच महाग पडू शकते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गोंदिया तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनासह शहर आणि तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. शनिवारी जिल्ह्यात २२ बाधितांची नोंद झाली, तर ७ बाधितांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १, बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७०१९३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५८४०२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६८५३९ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२३३८ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १४४२२ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी १४११६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १२१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया प्रयोग शाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.  

कोरोनाचा रिकव्हरी दर ९७.९७ मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दरसुद्धा कमी झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी ९७.९७ टक्के आहे. गोंदिया तालुक्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने थोडी चिंता वाढली आहे. जिल्ह्यात ५३७ फ्रंट लाइन योद्ध्यांना दुसरा डोस कोरोना लसीकरणांतर्गत जिल्ह्यातील फ्रंट लाइन योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले होते. यानंतर आता त्यांना दुसरा डोस दिला जात आहे. यांतर्गत ५३७ जणांना आतापर्यंत दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत ४३१ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. 

६० वर्षांवरील नागरिकांना करावी लागणार नोंदणीकेंद्र सरकारने २ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोविन २ ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर लसीकरण करणाऱ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या