शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहर येणार सीसीटिव्हीच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 21:25 IST

शहरातील चोरी व गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी शहरातील प्रमुख भागांत सीसीटिव्ही लावले जाणार आहेत.

ठळक मुद्दे१४५ लाखांची योजना : गोपालदास अग्रवाल यांनी वाढवून दिली मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील चोरी व गुन्हेगारीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी शहरातील प्रमुख भागांत सीसीटिव्ही लावले जाणार आहेत. सन २०१३ पर्यंत मुदत असलेल्या या १४५ लाखांच्या योजनेची मुदत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी वाढवून दिली आहे. त्यामुळे आता या मार्च महिन्यापर्यंत शहरातील प्रमुख भाग सीसीटिव्हीच्या निगराणीत येणार आहे.सन २०११ मध्ये सराफा व्यापारी बरबटे ज्वेलर्स व आकाश ज्वेलर्स मध्ये दरोड्याचा प्रयत्न व दुकानाच्या चौकीदाराचा खून करण्यात आला होता. हे प्रकरण आमदार अग्रवाल यांनी गांभीर्याने घेत तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करून मांडले होते. तसेच तत्कालीन पोलीस अधीक्षक मिना यांची भेट घेऊन त्यांना गुन्हेगारीवर आळा आळा घालण्यासाठी शहरातील चौका-चौकांत सीसीटिव्ही व गश्त लावण्याची मागणी केली होती.याशिवाय तत्कालीन पालकमंत्री अनील देशमुख यांना सीसीटिव्हीसाठी नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र नियमानुसार गोंदिया सारख्या लहान शहरात सीसीटिव्ही लावण्याबाबत शासनाकडे कोणतीच योजना नसल्याने नियोजन समितीकडून मंजूरीसाठी प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. आमदार अग्रवाल यांनी सततचा पाठपुराव व प्रयत्न करून शासनाकडून सीसीटिव्ही लावण्याबाबत शासनाकडून मंजूरी मिळवून घेतली होती. तसेच सन २०१२-१३ मध्ये सीसीटिव्ही लावण्यासाठी नियोजन समितीच्या नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत १४५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.शहरातील सर्व प्रमुख मार्ग व सार्वजनिक स्थळांवर सीसीटिव्ही लावण्यासाठी हा निधी पोलीस विभागाला ३१ मार्च २०१३ पर्यंत खर्च करावयाचा होता. मात्र पोलीस विभागाच्या ढिसाळ कार्यप्रणालीमुळे हे काम झाले नाही व नियमानुसार पोलीस विभाग आता हा निधी खर्च करू शकत नाही. यावर आमदार अग्रवाल यांनी सन २०१४-१५ मध्ये हा निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून देण्याकरिता प्रस्ताव शासनाला पाठविला होता. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर राज्य शासनाच्या वित्त व नियोजन विभागाने गुरूवारी (दि.२) विशेष आदेश काढून सीसीटिव्ही लावण्याच्या कामाची मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत वाढवून दिली. यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत १४५ लाख रूपयांच्या निधीतून अत्याधुनिक सीसीटिव्ही लावले जातील. असे झाल्यास शहरातील गुन्हेगारी व चोरीच्या घटनांवर अंकुश लागेल.