शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एसएमएसद्वारे नागरिकांना मिळणार प्रकरणांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:58 IST

साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील प्रकरणाची माहिती आता संबंधिताना एसएमएसव्दारे मोबाईलवर दिली जाणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पायपीट होणार कमी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील प्रकरणाची माहिती आता संबंधिताना एसएमएसव्दारे मोबाईलवर दिली जाणार आहे. त्यामुळे श्रम, वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या विविध अपील प्रकरणात वारंवार येणाºया नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात पारदर्शीता आणण्यासाठी व नागरिकांच्या पैसा आणि वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अपील प्रकरणात संबंधितांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुनावणीची दिनांक व वेळ याबाबतची पूर्व सूचना देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु केली. अनेकदा प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्ततेमुळे किंवा महत्त्वाच्या कामांमुळे अपील प्रकरणाची सुनावणी होत नाही. त्यामुळे सुनावणीसाठी दूरवरुन येणाºया नागरिकांचा वेळ, प्रवास व पैशाचा अपव्यय होतो.तसेच काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यास त्याची सूचना आणि दिनांक व वेळेची माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे संबंधितांना देण्यात येईल. त्यामुळे नागरिक ठरविलेल्या तारखेस वेळेत उपस्थित राहतील.अपिल प्रकरणात असलेल्या सर्व संबंधितांना या सुविधेमुळे लाभ होणार आहे. नागरिकांची होणारी पायपीट कमी होवून त्यांच्या वेळ आणि पैशाची बचत व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.- डॉ.कादंबरी बलकवडे,जिल्हाधिकारी गोंदिया.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी