शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:43 IST

येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी महामार्ग पार करुन जातात महिला : अपघाताची शक्यता

डी.आर.गिेºहेपुंजे।लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. मात्र ग्राहकांना देयक नियमित पाठविले जाते. ग्राहकांनी याची तक्रार जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे केली. मात्र त्याचा कसलाही उपयोग झाला नाही. ही नळयोजना ३५ वर्षे जुनी असून नवीन नळयोजना मंजुर झाली आहे. लवकरच तुम्हाला पाणी मिळेल. असे आश्वासन लोकप्रतिनिधी गेल्या तीन-चार वर्षांपासून देत आहेत.जुन्या नळ योजनेचे पाईप सिंमेटचे आहेत. प्रेशर वाढविल्यास ते फुटतात. त्यामुळे ती दुरुस्ती आपल्यालाच करावी लागणार या भितीने जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी प्रेशर वाढवित नसल्याची माहिती आहे. जास्त वेळ पंम्पीग केल्यास नळाला पाणी येऊ शकते. पण वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी, विद्युत देयक जास्त येते, पाण्याच्या पाणीपट्टीतून तेवढा पैसा जमा होत नाही. असे कारण पुढे करुन याकडे दुर्लक्ष करतात.शहरात कुठेही सार्वजनिक नळ नाहीत. प्रत्येकाकडे मिटर लागलेले आहेत. तरीही पाण्याची चोरी होते. तर दुसरीकडे नागरिक, महिला पाण्यासाठी भटकतात.सहकार नगरात पाणीच येत नसल्याने येथील अबालवृद्ध महिला तिरोडा गोंदिया- महामार्ग ओलांडून शहिद मिश्रा वॉर्डात पाण्यासाठी सकाळ-संध्याकाळ जाताना दिसतात. अशात कधी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लिकेज, टुल्लू पंपमुळे अडचणशहराच्या इतरही काही भागात नळाच्या पाण्याची स्थिती फारच वाईट आहे. पिण्याचे पाणी आवश्यक असल्याने दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सहकार नगरात पाणी येत नाही. याबाबत जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी मडके यांच्याशी संपर्क साधून समस्या सांगितली असता लिकेज आणि टुल्लू पंपमुळे पाणी पोहचत नसल्याचे त्यांनी सांगितले.दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातशहरात सलग नाल्याची व्यवस्था नसल्याने शहरातील सांडपाणी शहरातच मुरते. त्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. शहरातील विहिरींच्या बाजुनेच सांडपाणी मुरते. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. नगर परिषदेतर्फे ब्लिचिंग पावडरचा वापर देखील केला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.