प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश अध्यक्ष योगिता जयस्वाल, उपाध्यक्ष ऋतुजा दुरुगकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोदी, अभिजित राऊत, महेश ठकरानी, गोंदिया राईस सिटीच्या माजी अध्यक्ष मंजू कटरे, सचिव तुषार नेचवानी, साशा बोरकर उपस्थित होते. याप्रसंगी माजी अध्यक्ष ऋतुजा खेडीकर यांनी सन २०२१ च्या अध्यक्ष सुरेखा आझाद मेश्राम बोरकर यांना शपथ दिली. बोरकर यांनी आपल्या २०२१ च्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सौरभ अग्रवाल, अंकुश डोडानी, रवी सपाटे, सौरभ जैन, वासुदेव रामटेक्कर, गौरव बैस, हर्ष अग्रवाल, सारनाथ बोरकर, अभिजित रामटेके,पूर्वा बागडे, मधुलिका नागपुरे, दीपाली वाढई, मीनाक्षी कटरे, प्रणय अग्रवाल, पीयूष गोसेवाडे, कल्याणी गाडेकर, त्रिवेणी डोहरे, श्रद्धा यादव व अन्य सदस्य उपस्थित होते.
सीआई गोंदिया राईस सिटी शपथ ग्रहण सोहळा उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST