शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायाअभावी चायना सिरीजलाच पसंती

By admin | Updated: October 22, 2016 00:33 IST

भारतात सिरीज (लाईटींग) बनविण्याचे काम बंद असल्याने पर्याया अभावी नागरिकांना चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे.

दिवाळीनिमित्त खरेदी सुरूच : भारतीय सिरीज बनविण्याची गरज कपिल केकत  गोंदियाभारतात सिरीज (लाईटींग) बनविण्याचे काम बंद असल्याने पर्याया अभावी नागरिकांना चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे. चायना आयट्म्सला कितीही विरोध असला तरी सिरीजच्या बाबतीत मात्र नागरिकांना मनमारावे लागत आहे. त्यामुळे भारतात सिरीज तयार करण्याची मागणीही होत आहे. तोवर दिवाळीत घरांवर चायना सिरीजच चकाकणार हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. प्रकाशाच्या सणात प्रत्येकांनाच आपले प्रकाशमान करावयाचे आहे. यासाठी उत्तम माध्यम हे सिरीज (लाईटींग) आहे. रंगबिरंगी सिरीज घरावर लावल्यानंतर रात्रीला त्यांचा उजेड आकर्षूण घेतो. बाजारात वेगवेगळ््या प्रकारच्या सिरीज यासाठी उपलब्ध आहेत. मात्र या सर्व सिरीज चायना मेड असून भारतात सिरीजचे उत्पादन होत नसल्याची आजची परिस्थिती आहे. परिणामी सर्वांना आपल्या घरांच्या सजावटीसाठी चायना सिरीजचीच खरेदी करावी लागत आहे. एकीकडे चायना मेड आयट्मवर बहिष्कार टाकला जात आहे. कित्येकांनी त्याचधर्तीवर चायना आयट्म्स खरेदी न करण्याचा संकल्पही घेतला असून त्यांनी चायना सिरीजची खरेदी केली नसावी. मात्र दिवाळी या सणात आपल्या घराच्या सजावटीसाठी बहुतांश नागरिक सिरीज खरेदी करतच असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे चायना सिरीजला पर्याय नसल्याने मागणी आहेच. शिवाय विक्रेते सुद्धा मर्जी नसतानाही फक्त व्यापार म्हणून चायना सिरीजची विक्री करीत आहेत.राष्ट्रीय पातळीवर बंदी हवी देशवासीयांकडून चायना आयटम्स खरेदी करण्यावर बहिष्कार टाकला जात आहे. मात्र सणामुळे व चायना सिरीजला पर्याय नसल्यामुळे कित्येकांकडून मनमारून चायना सिरीज खरेदी केली जात आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच नियोजन करून देशात चायना आयटम्सलाच बंदी घालण्याची गरज असल्याचेही काहींनी बोलून दाखविले. देशात चायना आयटम्स येणार नाहीत, अशात देशातच सिरीज तयार करण्याचे कारखाने सुरू होतील व देशावासी आपल्या देशातीलच सिरीज खरेदी करू लागतील असे नागरिकांचे मत आहे. ३० रूपयांपासून सिरीज उपलब्ध बाजारात सध्या ३० रूपयांपासून १५० रूपयांपर्यंत चायना सिरीज उपलब्ध आहेत. विविध रंग व प्रकारांची ही सिरीज असल्याने नागरिकांकडून दिवाळीच्या सजावटीनिमित्त या सिरीजची खरेदी केली जात आहे. त्यामुळे सध्या इलेक्ट्रनिक साहीत्यांच्या दुकानात नागरिकांची सिरीज खरेदीसाठी जास्त गर्दी दिसू लागली आहे. सिरीजचा हा व्यवसाय दिवाळीतच राहतो त्यामुळे व्यापारीही मोठ्या प्रमाणात सिरीज मागवून ठेवतात.