शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी ४० गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:06 IST

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ४० गावांची निवड केली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईची समस्या होणार दूर : राज्य शासनाची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ४० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेची कामे केली जाणार आहेत.ग्रामीण भागातील जनतेला अनेकदा पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. ग्रामीण भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबून त्यांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प, आपलं पाणी, नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीरीवरील योजना, लघु नळपाणी पुरवठा योजना यासारख्या योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडविण्यात आले आहे.गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असताना धान या मुख्य पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत आहे.पाण्याच्या अतिउपशामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस घटत आहे. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची वाढती मागणी यासारख्या कारणामुळे ग्रामीण पाणी पुरवठ्यावर देखील प्रचंड ताण येत आहे.या बाबींचा राज्य शासनाने विचार करुन ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करु न ग्रामीण जनतेला पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म ही योजना जिल्ह्यातील ४० गावांसाठी राबविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सात तालुक्यातील ४० गावात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.योजनेत या गावांचा समावेशमुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत आमगाव तालुक्यातील दहेगाव. देवरी तालुका- शिरपूरबांध, भर्रेगाव, सावली, पिंडकेपार. गोंदिया तालुका- चंगेरा, गुदमा, नवनगाव/खुर्द, पांजरा, पोवारीटोला, रापेवाडा, सहेशपूर, लोहारा, सतोना, लोधीटोला, मोगर्रा. गोरेगाव तालुका- दवडीपार, कलपाथरी, मुरदोली, पिंडकेपार, पुरगाव, शहारवाणी, सोनेगाव. सडक/अर्जुनी तालुका- घाटबोरी/तेली, घटेगाव, गिरोला, डव्वा, डोंगरगाव, कनेरी/राम, खजरी, कोहळीटोला, वडेगाव. सालेकसा तालुका- निंबा. तिरोडा तालुका- नवेगाव, डब्बेटोला, गुमाधावडा, खैरलांजी, कोडेलोहारा, मुरपाडी व खुरकुडी आदी गावांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.योजनेवर २१ कोटी रुपयांचा खर्चएकूण ४० गावांसाठी सुरु होणाºया या योजनेवर एकूण २१ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. लवकरच या ४० गावातील ग्रामस्थांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म योजनेतून काम पूर्ण झाल्यानंतर पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे संबंधित गावातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.