शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
3
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
4
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
5
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
6
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
7
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
8
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
9
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
10
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
11
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
12
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
13
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
14
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
15
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
16
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
17
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
18
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
19
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
20
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी चिमुकल्यांची पंचायत समितीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:58 IST

शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर येऊन धडकली.

ठळक मुद्देग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप : आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर येऊन धडकली. भर उन्हात चिमुकल्यांनी तब्बल साडे तीन तास ठिय्या मांडला. लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता झाली.मोरगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत १ ते ८ वर्ग असून एकूण पटसंख्या १७४ आहे.आठ वर्गासाठी केवळ पाच शिक्षक आहेत. हा प्रकार मागील तीन वर्षापासून आहे.शाळा आहे पण शिक्षण मिळत नाही, शालेय स्तरावरुन मागणी व पाठपुरावा केला जातो,मात्र याकडे कानाडोळा केला जातो, शिक्षणाच्या कायद्यांतर्गत प्रत्येकाला शिक्षण मिळण्याचा मुलभूत अधिकार आहे. शाळाबाह्य मुले राहू नयेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र भौतिक व मुलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात नाही. असे विदारक चित्र जि.प.च्या शाळांमध्ये बघावयास मिळते, याचीच अनुभूती मोरगाववासीयांना आली. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शाळेला कुलप ठोकले.दोन शिक्षक व दोन वर्गखोल्यांचा गंभीर विषय घेऊन शाळेचे विद्यार्थी-विद्यार्र्थिनी तीन कि.मी पायपीट करीत पंचायत समिती कार्यालयावर येऊन धडकले.या वेळी शिक्षणाच्या अधिकारासंदर्भातील बोलकी फलके विद्यार्थ्याच्या हातात होती. शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे, अशी आर्त हाक देत पंचायत समिती कार्यालयाच्या पटांगणात विद्यार्थी पोहोचले. १९५६ ची जुनाट इमारत आहे. ती पडक्या अवस्थेत आहे. त्यामुळे कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वगखोलीच्या कमतरतेमुळे एका खोलीत दोन वर्ग अथवा व्हरांड्यात वर्ग भरविले जातात. त्यामुळे शिक्षण कमी व गोंधळच अधिक होतो. दोन शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते.शालेय परिसरात क्रीडांगणाची जागा नाही. जिथे जागा आहे त्यावर अतिक्रमण झाले असून ते शाळेपासून तीन किमी अंतरावर आहे.शालेय परिसरात एक पडक्या अवस्थेतील समाज मंदिर आहे. ते कुठल्याही कामाचे राहीले नाही. मोडकळीस आलेले हे समाज मंदिर जमीनदोस्त करुन त्याठिकाणी नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे.या बाबी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. या आंदोलनाच्या शिष्टमंडळात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, तानाजी लोधी, हेमंत लाडे, नरेंद्र लाडे, दयाराम सोनवाने, वैशाली गोबाडे, लता शहारे, ऋषी कोवे, क्षिरसागर लाडे, मनिषा शहारे, रमेश लाडे, देवराम पर्वते, वासुदेव चचाणे यांचा सहभाग होता.पदवीधर शिक्षकांची पदे रिक्तजि.प.च्या वर्ग ६ ते ८ पर्यंतच्या शाळांना पदवीधर शिक्षकांची आवश्यकता असते. जिल्ह्याभरात विज्ञान पदवीधर शिक्षक नाहीत. मोरगाव येथे कला व विज्ञान शाखेच्या पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. विज्ञान पदवीधर शिक्षक नसतांनाही विज्ञान विषय कला शाखेच्या पदवीधर शिक्षकाकडून शिकविली जातात. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे.त्यामुळे गुणवत्ता कशी असेल याची खात्री पटते. शासनस्तरावरुन यासंदर्भात पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.चर्चेनंतर आंदोलन मागेपंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती करुणा नांदगावे, प्रभागी गट विकास अधिकारी मयुर आंदेलवाड व गटशिक्षणाधिकारी एन.जे.शिरसाटे यांचेशी ग्रामस्थांनी चर्चा केली. २५ जुलैला पंचायत समिती मासीक सभा आहे.या सभेत सदस्यांशी चर्चा करुन नवीन शिक्षकांची शैक्षणिक कार्यासाठी मोरगाव येथे व्यवस्था करण्यात येईल. इतर शाळेत शिक्षक अतिरीक्त झाल्यास दुसºया शिक्षकाचीही व्यवस्था केली जाईल.तसेच दोन वर्गखोल्या जीर्ण असल्याचा प्रस्ताव जि.प.कडे ८ जुलै रोजी पाठविण्यात आला आहे.यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना देण्यात आले.त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.