शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रभारीच्या भरवशावर

By admin | Updated: September 23, 2016 02:10 IST

शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना सकष आहार देवून त्यांच्यामध्ये अक्षर ओळख निर्माण होण्यासाठी गावागावात अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली.

जि.प.ने लक्ष द्यावे : सर्वच कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवाबोंडगावदेवी : शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना सकष आहार देवून त्यांच्यामध्ये अक्षर ओळख निर्माण होण्यासाठी गावागावात अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात येते. परंतु अर्जुनी मोरगाव येथील कार्यालय आजघडीला ‘प्रभारी अधिकाऱ्यावर’ दिवस काढत असल्याचे दिसून येत आहे. आदिवासी तद्वतच जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला अर्जुनी मोरगाव तालुक्याला सध्यातरी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रत्येक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाणवा प्रकर्षाणी जाणवत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आस्थापना असलेले बाल विकास प्रकल्प कार्यालय, बालवयातील मुलांचे आरोग्य तसेच पोषक आहार यासंबंधी मुख्यत्वेकरुन नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. सध्या या कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी मिळत नाही, हे एक तालुक्याचे दुर्भाग्यच म्हणावा लागेल. तालुक्यात आजघडीला नियमित सुरू असलेल्या २१४ अंगणवाड्या तर ८ मिनी अंगणवाड्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची मुले कार्यरत असलेल्या अंगणवाड्यामधून देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा लाभ घेतात. तसेच किशोरवयीन मुली, गरोदर माता यांचासुद्धा अंगणवाडी केंद्राशी नियमित संबंध येतो. अंगणवाडी केंद्रामधून ० ते ५ वयोगटातील मुलांचे शरीर, आरोग्य सुदृढ राहावे म्हणूच बचत गटाच्या माध्यामतून आहार पुरविल्या जातो. तो आहार किती दर्जेदार असतो, याकडे कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सुतराम संबंध दिसून येत नाही, असे ठिक-ठिकाणी बोलल्या जाते. कार्यालयाला कायमस्वरुपी जबाबदार अधिकारी मागील काही वर्षापासून शोधून सापडत नसल्याने कार्यालयातील इतर कर्मचारी स्व:मर्जीने वागत असल्याचे दिसून येत आहे. सदर कार्यालयातील प्रकल्प अधिकारी पदावर देवरी येथील तुषार पवनीकर यांनी ७ जुलै रोजी कार्यभार घेतला. येथील कार्यालयाचा कार्यभार हा अतिरिक्त पदभार असल्याचे सांगण्यात येत आहे. पवनीकर हे देवरी येथून आपल्या सोयीनुसार येथील कार्यालयात भेट देत असल्याचे समजते. त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांची साहेब आॅफीसला नसल्याने सैरावैरासारखी स्थिती कार्यालयात निर्माण झालेली दिसते. आज तालुक्यात काही ठिकाणी कार्यकर्तीच्या जागा रिक्त आहेत. मदतनिस जबाबदारी सांभाळत असल्याचे बोलल्या जाते.बालवयातील मुलांशी निगडीत असलेला तालुका आजघडीला अधिकाऱ्यांविना पोरका असताना जिल्हा परिषद मात्र शांत आहे. तालुक्यातील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कसे आहे, बालके मॅम, सॅम अवस्थेपर्यंत जात आहेत का? याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. काही कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या पोषण आहार देवून अंगणवाडी केंद्र बंद करतात. बालकांना सुसंस्कार देण्यासाठी सवड मिळत नाही, असा प्रकार सुरू असल्याचे गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.एकंदरीत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा गॉडफॉदर नियमित कार्यालयात दिसणार नाही तर तालुक्यातील २२२ अंगणवाडी केंद्राची कोणती अवस्था राहणार यांचा जि.प. प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)