गोंदिया : देवरी तालुक्याच्या ककाेडी येथून छत्तीसगड राज्यात ३० पेटी दारू वाहून नेणाऱ्या वाहनाला ७ मे रोजी चिचगड पोलिसांनी पकडले. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ४ लाख ९० हजार रुपये सांगितली जाते. चिचगडचे ठाणेदार अतुल तवाडे, पोलीस नायक दुर्गादास गंगापारी, पोलीस शिपाई विष्णू राठोड, रवी जाधव, संदीप तुलावी यांनी नाकांबदी करून वाहन क्रमांक सीजी ०८ एएन २०५८ ला पकडले. त्या वाहनात १९ पेटी देशी दारू किंमत ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला. दुसरी बोलेरो पिकअप क्रमांक सीजी ०७ सीडी ०१५४ मध्ये ११ देशी दारूच्या पेट्या असा ३३ हजार रुपयांचा माल जप्त केला. दोन्ही वाहनांची किंमत ४ लाख असा एकूण ४ लाख ९० हजारांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. तपास पोलीस नायक दुर्गादास गंगापारी करीत आहेत.
चिचगड पोलिसांनी पकडल्या ३० दारूच्या पेट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST