शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

छत्तीसगड राज्याप्रमाणे धानाला भाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:06 IST

सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला. लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र महाराष्ट्रात अद्यापही १७५० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही छत्तीसगड प्रमाणेच धानाला २५०० हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सहषराम कोरोटे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : सत्तेत येण्यापूर्वी भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार रुपये प्रती क्विंटल भाव देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला. लगतच्या छत्तीसगड राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येताच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र महाराष्ट्रात अद्यापही १७५० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही छत्तीसगड प्रमाणेच धानाला २५०० हजार रूपये हमीभाव देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सहषराम कोरोटे यांनी केली आहे.सतत पडणाऱ्या ओला व कोरडा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे सरकार शेतकऱ्यांचे पालक असते . शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील निवडणूक प्रचारादरम्यान तेथील जनता व शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली.छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर १० तासांच्या आत धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्याची घोषणा करुन त्याची अंमलबजावणी केली.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व शेतकºयांच्या धानाला २५०० रुपये प्रती क्विंटल हमीभाव राज्य सरकारने द्यावा.ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत धान खरेदी केंद्रावर १७५० रुपये दराने धान विकले अशा सर्व शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे ७५० रुपये बोनसच्या रुपात देण्यात यावे. केवळ खोटी आश्वासने देऊन सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये.सरकारने शेतकऱ्यांच्या भावनाचा आदर करुन धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा अन्यथा या विरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे. तसेच आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.