शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यापासून धानाचा चुकारा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:26 IST

तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात.

ठळक मुद्देशासकीय आधारभूत केंद्र : शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कगुलाबटोला : तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात. मात्र धान विकून एक महिना ओलांडला तरी सुद्धा धानाचा चुकारा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. त्वरित चुकारा मिळाला नाही आंदोलन छेडण्याच्या तसेच तहसील कार्यालय येथे उपोषण करण्याच्या इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.तिरोडा तालुक्यात नवेझरी येथील पांडव सहकारी संस्थेच्यावतीने नवेझरी व विर्सी येथे आधारभूत केंद्र चालविले जातात. वडेगाव येथील नेहरु भात गिरणी सहकारी संस्थेच्यावतीने वडेगाव शेतकरी साधन सहकारी संस्था बघोलीच्यावतीने परसवाडा, तिरोडा सहकारी संस्थेच्यावतीने तिरोडा येथे सूर्यवंशी सहकारी संस्था तेढा तसेच भिवापूर, चिखली अशा नऊ केंद्रावर शेतकºयांची धान खरेदी मागील महिन्यापासून सुरु आहे. मात्र शेतकºयांना एक महिन्यापासून धानाचा चुकारा अजूनही मिळाला नाही.शेतकºयांना यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून धानाचा चुकारा देण्याची सोय होती. ती व्यवस्था शेतकरी हिताची होती. त्यावेळी धान्य खरेदी संस्थेच्या माध्यमातून केल्यानंतर त्यांची हुडी तयार करुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी याची स्वाक्षरी घेवून जिल्हा बँकेत बिल सादर केले जात. त्यानंतर मुंबई मार्केटिंग फेडरेशन महाराष्टÑ शासनाच्या तिजोरीतून रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली जात होती. संस्थेच्यावतीने धनादेशाच्या माध्यमातून शेतकºयांना रक्कम वितरीत केली जात होती व या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना चुकारा लवकर मिळत असे.परंतु सध्या आॅनलाईन धान खरेदी सुरु करण्यात आली. त्यामुळे धानाचा चुकारा सुद्धा आॅनलाईन शेतकºयांच्या खात्यात थेट जमा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांचा चुकारा फक्त एकाच ठिकाणावर होणार. तर लाखो शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा कसा मिळणार आणि उशिर तर नक्की होणारच.त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नाही. त्वरित शेतकºयांचा चुकारा मिळाला नाही तर आंदोलन छेडून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष भांडारकर यांनी दिला आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे असे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांची मागणी आहे.