शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:31 IST

येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत उपअभियंता शिवकुमार आर. शर्मा यांनी वर्षभरात ४१ लाख ५० हजार ४०४ रूपयांचा अपहार केला.

ठळक मुद्दे४१ लाख ५० हजार रुपयांची अफरातफर : जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील प्रकार, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत उपअभियंता शिवकुमार आर. शर्मा यांनी वर्षभरात ४१ लाख ५० हजार ४०४ रूपयांचा अपहार केला. त्याच्याविरूद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिरोडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता म्हणून शिवकुमार आर. शर्मा (५६) याने २८ आॅक्टोबर २०१५ ते १९ आॅक्टोबर २०१६ या वर्षभराच्या काळात तिरोडा तालुक्यातील पाच नळ योजनेच्या कामात ४१ लाख ५० हजार ४०४ रुपयांचा अपहार केला आहे. तसेच काम पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला ४७ लाख ३६ हजार ६३० रुपये अदा केले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेने चौकशी समिती गठीत केली होती. तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी, बेरडीपार, लोणारा, कोयलारी व सितेपार या पाच गावातील नळ योजना कोट्यवधी रुपयातून तयार करायच्या होत्या. यात शिवकुमार शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार केला. शर्मा यांच्याकडे त्या काळात कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा हे पद होते. पाणी पुरवठा योजनांच्या खर्चा संदर्भात ४ टक्के, सादील खर्चात अनियमितता केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते. वरिष्ठांची मंजुरी न घेता २१ लाख ५० हजार ९०८ रुपये व राज्य शासनाची परवानगी न घेता १ कोटी २९ लाख ४३ हजार ८९८ रुपये शर्मा यांनी खर्च केले होते. १७ मार्च २०१० च्या शासन निर्णयाला डावलून शर्मा यांनी नळ योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने केले होते. काम अपूर्ण असल्यामुळे त्या योजनांचे मुल्यांकन करता येत नसतांनाही त्या योजनांचे मूल्यांकन केल्याचे खोटे गोषवारे तयार करुन समितीमार्फत कंत्राटदारास पैसे दिले आहे. जो कंत्राटदार पाणी पुरवठा योजनेचे काम करतो त्या कामाची दहा टक्के रक्कम वर्षभर थांबवून ठेवावी लागते. त्या योजनेत काही त्रुट्या असल्या, बांधकाम चुकीचे असले किंवा तुट-फुट झालेल्या साहित्याची दुरुस्ती करण्यासाठी १० टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागते. परंतु शिवकुमार शर्मा यांनी १० टक्के रक्कम म्हणजेच ४७ लाख ३६ हजार ६३० रुपये कंत्राटदाराला दिली आहे. शिवकुमार शर्मा यांनी शासनाची दिशाभूल करुन सोनेखारी, बेरडीपार, लोणारा,सितेपार व कोयलारी या पाच नळ योजनेचे ४१ लाख ५० हजार ४०४ रुपये अपहार केले आहे. त्यामुळे महाराष्टÑ नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ मधील नियम ८ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. जोडपत्र १ ते ४ च्या अनुषंगाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत. शिवकुमार शर्मा विरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.चौकशी समितीत यांचा समावेशग्रामीण पाणी पुरवठा येथील उपविभागीय अभियंता शिवकुमार शर्मा यांनी केलेल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीत उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एस.बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एस.एफ.विश्वकर्मा, मुख्य व वित्त लेखा अधिकारी ए. के. मडावी, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी पी.बी.गावडे यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या चौकशीत शिवकुमार शर्मा दोषी आढळले आहेत.