गोंदिया : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे शहरी भागातील स्वस्त धान्य दुकानांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ९९८ स्वस्त धान्य दुकाने असून, यापैकी शहरी भागात ५५, तर ग्रामीण भागात ९४३ दुकाने आहेत. शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी देण्यास शासनाने स्थगिती दिली होती. ही स्थगिती १६ सप्टेंबर रोजी उठविली असून, विभागीय आयुक्त कार्यालयाने शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाला पत्र दिले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने तहसील कार्यालयाकडून यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत. मागील तीन वर्षांपासून शहरी भागात स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी देण्यात आली नव्हती. त्यामुळे रेशनकार्डधारकांच्या अडचणीतसुद्धा वाढ झाली होती. मात्र, आता ही अडचण दूर होणार आहे.
................. कोट
शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडून मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभाग त्याला मंजुरी देईल. ऑक्टोबरपूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
- अनिल सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी
.......
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकान
एकूण
९९८ शहरी : ५५
ग्रामीण : ९४३
...................
काय आहेत अडचणी
- मागील तीन वर्षांपासून शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी देण्यास स्थगिती होती.
- त्यामुळे शहरी भागात रेशनकार्डधारकांची संख्या वाढली असता दुकानांची संख्या वाढली नव्हती.
- परिणामी लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत होते.
................
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक
२२९८३६
अंत्योदय रेशनकार्डधारक
६८१०६१
प्राधान्य गटातील
७३२३४
.....................