शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चावडी, सभामंडपांवर अर्धाअधिक खर्च

By admin | Updated: July 27, 2014 00:10 IST

जिल्ह्यातील चारही आमदारांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक विकास निधीतील सर्वाधिक निधी सभामंडप आणि चावडी बांधकामांवर खर्च केला आहे. पण गावातील नाल्या,

गोंदिया : जिल्ह्यातील चारही आमदारांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक विकास निधीतील सर्वाधिक निधी सभामंडप आणि चावडी बांधकामांवर खर्च केला आहे. पण गावातील नाल्या, हातपंप किंवा इतर प्रकारच्या सोयीसुविधांकडे आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक गावांमध्ये अजूनही अनेक सुविधांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे.आपल्या मतदार संघातील नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे विविध सार्वजनिक सोयीसुविधांसाठी आमदारांचा स्थानिक विकास निधी वापरला जाणे अपेक्षित आहे. परंतू काही आमदारांनी नागरिकांच्या सोयीपेक्षा कार्यकर्त्यांची ‘सोय’ करून दिल्याचे दिसून येते. छोट्यामोठ्या कामांचे कंत्राट आपल्या कार्यकर्त्याला देऊन खुश करण्यासाठी जास्तीत जास्त निधी बांधकामांवर खर्च करण्यात आला आहे. त्यातही सर्वच आमदारांनी सर्वाधिक प्राधान्य सभामंडपाच्या बांधकामाला दिले आहे. त्याखालोखाल चावडी बांधकाम आणि नंतर रस्त्याच्या कामांचा क्रमांक लागतो. याशिवाय बोअरवेलचेही वाटप आमदारांनी केले, पण त्यांची संख्या कमी आहे.विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे या शेवटच्या वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून जास्तीत जास्त कामे करण्याकडे आमदारांचा कल दिसून आला. २०१३-१४ या वर्षात तिरोड्याचे आमदार डॉ.खुशाल बोपचे यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत ७५ कामे झाली आहेत. त्यावर १ कोटी ७६ लाख ३५ हजारांचा निधी प्रस्तावित होता. त्याखालोखाल २१ लाख ८८ हजार रुपये तिरोडा नगर परिषदेतील ७ कामांसाठी मंजूर केले.आ. गोपालदास अग्रवाल यांनी गतवर्षात सर्वाधिक ९९ लाख ५४ हजार रुपये बांधकाम विभाग (रोहयो) यांच्या १४ कामांसाठी दिले. त्यानंतर ९३ लाख ७८ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला ७१ कामांसाठी दिले. याशिवाय २५ लाख २२ हजारांची २६ कामे पाणी पुरवठा विभागाची केली आहेत.आ.राजकुमार बडोले यांनी १ कोटी ८१ लाख ५५ हजारांची ८० कामे जि.प. बांधकाम विभागामार्फत केली आहे. तर पाणी पुरवठ्याची ५ कामे केली आहेत. आ.रामरतन राऊत यांनी १ कोटी ३६ लाख ८२ हजारांची ६१ कामे जि.प.बांधकाम विभागामार्फत केली आहेत. याशिवाय पाणी पुरवठ्याची ९ व लघु पाटबंधारे विभागाची २ कामे केली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)