शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांचे विचार आत्मसात केल्याने परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:21 IST

भारतीय लोकांचा जर कोणी उद्धार करणार असेल तर बहुजन महापुरुषांच्या विचारानेच या देशातील भारतीय समाजात परिवर्तन होणार असे प्रतिपादन अजय काटेवार यांनी केले. आदिवासी समाज संघटना सहेसपुरच्यावतीने बिरसा मुंडा यांची १४३ वी जयंती व आदिवासी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

ठळक मुद्देअजय काटेवार : बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी : भारतीय लोकांचा जर कोणी उद्धार करणार असेल तर बहुजन महापुरुषांच्या विचारानेच या देशातील भारतीय समाजात परिवर्तन होणार असे प्रतिपादन अजय काटेवार यांनी केले. आदिवासी समाज संघटना सहेसपुरच्यावतीने बिरसा मुंडा यांची १४३ वी जयंती व आदिवासी मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन अनिल वट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी चिरंजीव नागपुरे, सरपंच हितेश पताहे, उपसरपंच रिना कोल्हारे, विक्रम कोल्हारे,धनराज पताहे, बेनीराम गावळे, प्रवीण चौरागडे, छाया बावणकर, गीता भोयर, सयजा बिरनवार, कल्पना पटले, पोलीस पाटील कुवरलाल शेंडे, ईश्वरी पटले, शालीकराम कवरे, कुवरलाल राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गावात सकाळी प्रभातफेरी काढून व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करून करण्यात आली. तर दुपारी १ वाजता वट्टी यांच्या हस्ते उद्घाटन व काटेवार यांच्या अध्यक्षतेत क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन करण्यात आली.प्रास्तावीक ग्राम सहेसपूरचे सरपंच हितेश पताहे यांनी मांडले. याप्रसंगी वट्टी यांनी बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र व संघर्ष या विषयी माहिती दिली. काटेवार यांनी, अंधश्रध्दा ही समाजात लागलेली मोठी किड आहे. या किडीच्या प्रभावातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाने मनुष्य विचार करायला लागतो व विचारातून तर्क करता येतो, यातून समाजाला जागरूक करता येत शिवाय अंधश्रध्देचा नायनाट करता येत असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सभापती पी.जी.कटरे, रंगमंच पूजन प्रकाश पटले यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राधेलाल पटले, राजू कटरे, संजय बावनकर उपस्थित होते.